शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात रस्ते विकासाची ‘उड्डाणे’

By admin | Updated: August 21, 2014 00:12 IST

औरंगाबाद : वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकात तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर उड्डाणपुलाची कामे झाल्याने शहर आणि परिसरात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांत औरंगाबाद शहराचा आणि परिसराचा चेहरामोहराच बदलला असून, वाहतूक कोंडी होणाऱ्या चौकात तसेच वर्दळीच्या रस्त्यांवर उड्डाणपुलाची कामे झाल्याने शहर आणि परिसरात वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली आहे. मागील दहा वर्षांत उड्डाणपुलाच्या बाबतीत शहरातील वातावरण अनुकूल बनले असून, सात उड्डाणपुलांची कामे मार्गी लागली आहेत. येत्या दोन वर्षांत शहरात आणखी तीन उड्डाणपुलांची भर पडणार असल्याने हे शहर विकासाच्या बाबतीत उड्डाण घेत असल्याचे दिसत आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी औरंगाबादचे तत्कालीन आमदार राजेंद्र दर्डा यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या १६७ कोटी रुपयांच्या एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत औरंगााबाद शहरासाठी रस्ते, सबवे, ंिरंग रोड, उड्डाणपूल, रेल्वे उड्डाणपूल, लिंक रोड असा विकासाचा पेटाराच उघडला गेला. त्याअंतर्गत सर्वप्रथम लाडगाव आणि झाल्टा या शहराच्या परिसरात रेल्वे उड्डाणपुलांचे काम पूर्ण झाले. त्याच वेळी जालना रोडवरील सेव्हन हिल येथे उड्डाणपुलाचे काम झाले. रेल्वेस्टेशनजवळही पैठण रोडला जोडणारा उड्डाणपूल झाला. ही सर्व कामे वेगाने सुरू झाली. एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत टाऊन हॉल येथे उड्डाणपूल झाला. त्यामुळे सेव्हन हिल, रेल्वेस्टेशन, टाऊन हॉल येथे होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर झाली. क्रांतीचौक उड्डाणपूलशहरातील प्रमुख चौकांपैकी एक असलेल्या क्रांतीचौकातील रेल्वेस्टेशन ते पैठणगेट आणि बाबा पेट्रोलपंप ते सिडकोकडे जाणारी वाहतूक लक्षात घेता या ठिकाणी उड्डाणपूल बांधणे गरजेचे असल्याने या चौकात २००८ मध्ये उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा प्रकल्प हाती घेतला. ४५४ मीटर लांबीच्या या उड्डाणपुलाचे बांधकाम बरेच दिवस रखडले. मात्र, हा पूल जुलै २०१२ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. काम रखडल्यामुळे परिसरातील नागरिकांना थोडा त्रास सहन करावा लागला असला तरी यामुळे वाहतुकीची कोंडी फुटली.