रिपाइंला हवंय राज्यात मंत्रीपद; रामदास आठवले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली अपेक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 20:57 IST2018-06-28T20:53:48+5:302018-06-28T20:57:49+5:30

महाराष्ट्राच्या सत्तेत रिपाइंला वाटा मिळाला पाहिजे. एकतर महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी उशीर झाला आहे असे मत

Ripimala is the minister in the state of Uttar Pradesh; Ramdas Athavale expressed hope at the workers gathering | रिपाइंला हवंय राज्यात मंत्रीपद; रामदास आठवले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली अपेक्षा 

रिपाइंला हवंय राज्यात मंत्रीपद; रामदास आठवले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली अपेक्षा 

औरंगाबाद : महाराष्ट्राच्या सत्तेत रिपाइंला वाटा मिळाला पाहिजे. एकतर महामंडळांवर कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी उशीर झाला आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा व आमच्या कार्यकर्त्यांबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांनाही महामंडळांमध्ये न्याय देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे अशी अपेक्षा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज रिपाइंच्या मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. 

मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये आयोजित रिपाइंच्या मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठकीसाठी केंद्रीय राज्यमंत्री आठवले शहरात आले होते. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी महाराष्ट्रात आरपीआयला एक एमएलसी व एक मंत्रीपद मिळावे. मला केंद्रात मंत्रीपद मिळाले, महाराष्ट्रामध्येही आरपीआयला एक मंत्रिपद मिळाले पाहिजे असे मत व्यक्त केले. यासोबतच राहिलेल्या एक- दीड वषासार्ठी का होईना आरपीआयला राज्यात संधी मिळाली पाहिजे, यासाठी एक- दोन दिवसांतच आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Ripimala is the minister in the state of Uttar Pradesh; Ramdas Athavale expressed hope at the workers gathering