शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

रिक्षातून अधिक प्रवासी वाहतूक करताना पकडल्याने वाहतूक पोलिसाला नेले फरपटत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:12 PM

सिडको वाहतूक शाखेत कार्यरत शेख हे त्यांचे सहकारी घुगे यांच्यासह  हायकोर्टजवळ चौकात ड्यूटीवर होते.

ठळक मुद्दे पायाचे हाड मोडले, उजव्या हाताला आणि गुडघ्याला जबर दुखापत झाली. वाहनचालकांनी पुढे काही अंतरावर चालकाला पकडून चांगलाच चोप दिला

औरंगाबाद : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणारी रिक्षा पकडताच  चालकाने वाहतूक पोलिसाला धक्का मारून सुमारे पाच ते दहा फूट फरपटत नेले. यात रिक्षाचे मागील चाक पायावरून गेल्याने पोलीस जखमी झाला.  पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकाला प्रत्यक्षदर्शींनी पाठलाग करून पकडले आणि चोप देत पोलिसांच्या हवाली केले.

या घटनेत पोलीस नाईक हसिबउद्दीन गयोसाउद्दीन शेख हे जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिडको वाहतूक शाखेत कार्यरत शेख हे त्यांचे सहकारी घुगे यांच्यासह  हायकोर्टजवळ चौकात ड्यूटीवर होते.  सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास सिडकोकडून आलेल्या रिक्षात (एमएच- २० ईके- ०८०४) चालकाशेजारी दोन प्रवासी आणि मागील सीटवर चार प्रवासी बसलेले त्यांना दिसले. कारवाई करण्यासाठी शेख यांनी समोरील दोन्ही प्रवासी उतरविले आणि स्वतः रिक्षात बसून चालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. 

रिक्षाचालक फारुख शहा निसार शहा (रा. हिनानगर, चिकलठाणा)  याने शेख यांना जोराचा धक्का मारून खाली ढकलले व रिक्षा दामटली. शेख यांनी तोल सावरण्यासाठी रिक्षाचा रॉड पकडला. त्यामुळे रिक्षासोबत ते १० ते १५ फूट फरपटत गेले. रिक्षाचे मागील चाक पायाच्या घोट्यावरून गेल्याने ते खाली पडले. यात त्यांच्या पायाचे हाड मोडले, उजव्या हाताला आणि गुडघ्याला जबर दुखापत झाली. यानंतर रिक्षाचालक सुसाट निघाला. हा प्रकार पाहणाऱ्या वाहनचालकांनी पुढे काही अंतरावर त्याला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. शेख यांच्या तक्रारीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात आरोपी फारुख शहाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.

दोन रुग्णालयांतून तिसऱ्या ठिकाणी दाखल शेख यांना जखमी अवस्थेत एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पोलीस प्लॅनची सुविधा नसल्यामुळे त्यांना समर्थनगरातील जोशी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र, पोलिसांवरील उपचाराचे शासनाने बिल न दिल्यामुळे त्यांच्या रुग्णालयाने पोलीस प्लॅनअंतर्गत उपचार बंद केल्याचे सांगण्यात आल्याने शेख यांना सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस