बक्षिसाचे आमिष; युवकाला ७१ हजारांचा गंडा

By Admin | Updated: June 21, 2014 01:01 IST2014-06-21T00:42:52+5:302014-06-21T01:01:07+5:30

वाळूज महानगर : अभिनंदन... तुम्ही तब्बल १ कोटी ६० लाख रुपये जिंकला आहात... असा ई-मेल पाठवून वाळूज परिसरातील लांझी येथील युवकाला ७१ हजार रुपयांचा गंडा घातल्याची

Rewards bait; The child has a baby boy of 71 thousand | बक्षिसाचे आमिष; युवकाला ७१ हजारांचा गंडा

बक्षिसाचे आमिष; युवकाला ७१ हजारांचा गंडा

वाळूज महानगर : अभिनंदन... तुम्ही तब्बल १ कोटी ६० लाख रुपये जिंकला आहात... असा ई-मेल पाठवून वाळूज परिसरातील लांझी येथील युवकाला ७१ हजार रुपयांचा गंडा घातल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. युवकाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले की, नवीन लहानू नाडे (२३, रा. लांझी, ता. गंगापूर) या युवकाच्या मोबाईल क्रमांक ९७६७७८३६०५ वर सहा महिन्यांपूर्वी जानेवारी महिन्यात तुम्ही १ कोटी ६० लाख रुपये जिंकल्याचा ई-मेल भामट्यांनी पाठविला होता. आरोपींनी नाडे यांच्याशी मोबाईल क्रमांक ९१७८३८०२९७१९, ९१७८२७१०८३८१ व ९१९१३६१७१४३७ या मोबाईल क्रमांकावरून सतत संपर्क करणे सुरू केले. बक्षिसाची रक्कम मिळविण्यासाठी सीमा शुल्काचे २१ हजार ५०० रुपये भरण्यास सांगितले.

वाळूज महानगर : या भामट्यांच्या आमिषाला बळी पडून नवीन नाडे याने बँक खात्यावर (क्रमांक २०१७५७९८९४१) २१ हजार ५०० रुपये भरले. यानंतर आरोपींनी इंडोसमेंट रक्कम म्हणून के. प्रशांत याच्या अकाऊंटवर (क्रमांक २०१७५७६८३८२) २४ हजार ९५०, टी. जारा यांच्या बँक खात्यावर (क्रमांक २०१८०२८९०९) २५ हजार रुपये भरले. २४ जानेवारी ते ३१ जानेवारीदरम्यान आरोपींच्या खात्यावर ७१ हजार ४५० रुपये भरले. सर्व रक्कम भरूनही आरोपींनी नाडे यांना बक्षिसाची रक्कम दिली नाही. पुन्हा नाडे यांच्या मोबाईलवर संपर्क साधून आरोपींनी २ हजार ५०० रुपयांची मागणी केली. या प्रकारामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच नाडे यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज केला. या प्रकरणी पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी सदरील गुन्ह्याच्या तपासासाठी सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्याकडे सोपविला होता. सदरील फसवणुकीचा गुन्हा वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे काल हा गुन्हा वाळूज पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.

Web Title: Rewards bait; The child has a baby boy of 71 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.