छत्रपती संभाजीनगर: शहरातील गॅस सिलिंडरचा काळाबाजार आणि वितरणातील गोंधळ रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता थेट 'अॅक्शन मोड'मध्ये काम सुरू केले आहे. शहरातील २३ मुख्य गॅस एजन्सींवर महसूल प्रशासनाचा प्रत्येकी एक कर्मचारी शुक्रवारपासून नियुक्त करण्यात आला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या तीन आठवड्यांपासून गॅस एजन्सीसमोर लागणाऱ्या लांबच लांब रांगा आणि ग्राहकांच्या वाढत्या तक्रारींमुळे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
ओटीपी आणि ऑनलाईन बुकिंगची होणार 'क्रॉस चेकिंग'एजन्सीवर नियुक्त केलेले हे महसूल कर्मचारी प्रामुख्याने ऑनलाईन बुकिंगनुसारच सिलिंडरचे वितरण होते की नाही, याची खातरजमा करतील. ज्या ग्राहकाचा ओटीपी (OTP) आहे, त्यालाच सिलिंडर मिळतेय की त्याचा गैरवापर करून काळाबाजार केला जातोय, यावर या कर्मचाऱ्यांची करडी नजर असणार आहे. काही ग्राहकांना सिलिंडर न मिळताच 'डिलिव्हरी' झाल्याचे मेसेज येत असल्याच्या तक्रारी वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्राहकांच्या नावावर सुरू असलेला 'काळाबाजार'काही एजन्सीचालक ग्राहकांच्या जुन्या बुकिंगचा डेटा वापरून त्यांच्या नावावर सिलिंडरचा काळाबाजार करत असल्याचा संशय प्रशासनाला आहे. एखाद्या ग्राहकाने दोन महिन्यांपूर्वी सिलिंडर घेतले असेल, तर त्याच्या आगाऊ बुकिंगचा ओटीपी मिळवून ते सिलिंडर चढ्या दराने इतरांना विकले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. बुकिंगमधील हा 'गॅप' पाहून काळाबाजार करणाऱ्यांवर आता प्रशासनाचा वचक निर्माण होणार आहे.
तीन आठवड्यांचा गोंधळ संपवण्यासाठी उपाययोजनाशहरात गेल्या वीस दिवसांपासून गॅस सिलिंडरसाठी नागरिक त्रस्त आहेत. एजन्सीसमोर पहाटेपासूनच गर्दी होत असल्याचे चित्र आहे. "प्रशासन या परिस्थितीवर अत्यंत गांभीर्याने लक्ष देऊन आहे. नियुक्त केलेले कर्मचारी वितरणाची संपूर्ण प्रक्रिया तपासून पाहतील, जेणेकरून सर्वसामान्यांना त्यांचा हक्क मिळेल," असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले. या कारवाईमुळे गॅस एजन्सीचालकांचे धाबे दणाणले आहेत.
Web Summary : To curb black marketing of gas cylinders and distribution chaos, the district administration has deployed revenue officers at 23 gas agencies in Chhatrapati Sambhajinagar. This ensures transparency in distribution, cross-checking online booking, OTP verification, and preventing misuse of old booking data. The move addresses citizen grievances and long queues.
Web Summary : गैस सिलेंडरों की कालाबाजारी और वितरण में अराजकता को रोकने के लिए, छत्रपति संभाजीनगर में जिला प्रशासन ने 23 गैस एजेंसियों पर राजस्व अधिकारियों को तैनात किया है। यह वितरण में पारदर्शिता सुनिश्चित करता है, ऑनलाइन बुकिंग, ओटीपी सत्यापन की क्रॉस-चेकिंग करता है और पुराने बुकिंग डेटा के दुरुपयोग को रोकता है। इस कदम से नागरिकों की शिकायतों और लंबी कतारों का समाधान होगा।