सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या

By Admin | Updated: May 12, 2014 00:03 IST2014-05-11T23:38:33+5:302014-05-12T00:03:34+5:30

नवीन नांदेड : नवीन नांदेड भागातील एनडी-४२ साईबाबानगर येथील ७० वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने अंगावर पेट्रोल ओतून घेवून पेटवून घेतले.

A retired teacher's suicide | सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या

सेवानिवृत्त शिक्षकाची आत्महत्या

 नवीन नांदेड : नवीन नांदेड भागातील एनडी-४२ साईबाबानगर येथील ७० वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाने अंगावर पेट्रोल ओतून घेवून पेटवून घेतले. त्यांना अधिक उपचाराकरीता येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले असता, त्यांचा रविवारी दुपारी एक वाजता मृत्यू झाला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हडको येथील सेवानिवृत्त शिक्षक हणमंतराव शंकरराव सांगवीकर यांनी ११ मे रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास राहत्या घरातील स्नानगृहात अंगावर पेट्रोलजन्य-ज्वलनशिल द्रव ओतून पेटवून घेतले. यामध्ये ते १०० टक्के भाजले. नातेवाईकांनी त्यांना अधिक उपचाराकरीता शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान दुपारी एक वाजता हणमंतराव सांगवीकर यांचा मृत्यू झाला. हणमंतराव सांगवीकर यांनी वेडसरपणात पेटवून घेतल्याची माहिती संजय सांगवीकर यांनी पोलिसांना दिली असल्याचे पोलिस ठाणे अंमलदार डी. एम. राठोड यांनी सांगितले. विशेष म्हणजे, हणमंतराव सांगवीकर हे जेव्हा, त्यांच्या घरी अंगावर पेट्रोल ओतून घेवून पेटवून घेतले त्याचवेळी त्यांच्या घरी मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. त्यामुळे गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची अफवा पसरली. या अफवेने घटनास्थळी सिडको व हडको भागातील महिला- पुरूषांची गर्दी झाली होती़ त्यानंतर घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे पोलिस निरीक्षक अपूर्वसिंह गौर व त्यांचे सहकारी ‘बीडीडीएस’ पथकातील ‘हिरा’ श्वानाने घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहिया व सहायक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनीही घटनास्थळाची पाहणी करून नांदेड ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना तपासासंदर्भात सूचना दिल्या. याप्रकरणी संजय सांगवीकर यांनी दिलेल्या माहितीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. पोहेकॉ. एस. एम. तोंडेवाड व पो.कॉ. गजानन राऊत हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. या घटनेबाबत सिडको व हडको परिसरात वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात येत असून पोलिस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहेत़ (वार्ताहर)

Web Title: A retired teacher's suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.