शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
8
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
9
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
10
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
11
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
12
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
13
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
14
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
15
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
16
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
17
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
18
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
19
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
20
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘शेवरलेट’ विसर्जन मिरवणुकीतून निवृत्त

By admin | Updated: September 8, 2014 00:32 IST

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद गणेश महासंघाचा मानाचा गणपती विसर्जनासाठी ६५ वर्षांपासून ज्या ऐतिहासिक ‘शेवरलेट’ गाडीत बसवून मिरवणुकीत नेला जात असे.

प्रशांत तेलवाडकर, औरंगाबाद गणेश महासंघाचा मानाचा गणपती विसर्जनासाठी ६५ वर्षांपासून ज्या ऐतिहासिक ‘शेवरलेट’ गाडीत बसवून मिरवणुकीत नेला जात असे. तिचा सारथी कै. सचिन चौहानचे दोन वर्षांपूर्वी निधन झाल्याने आता हे वाहनही मिरवणुकीतून रिटायर्ड झाले आहे. यामुळे यंदा मानाच्या गणपतीला निरोप देण्यासाठी दुसरे वाहन गणेशभक्तांना पाहण्यास मिळणार आहे. लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने स्वातंत्र्यपूर्व काळात शहरात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. १९२४ मध्ये महासंघाची स्थापना झाली. तेव्हाचे अध्यक्ष स्व. संग्रामसिंह चौहान यांनी १९४७ मध्ये ४५० हाली (निजामकालीन नाणे) देऊन शेवरलेट गाडी खरेदी केली होती. गाडीचे मॉडेल १९२८ चे होते. तेव्हा याच गाडीतून गणेश महासंघाचा गणपती विसर्जनासाठी नेला जायचा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गणेश महासंघाचे रूपांतर उत्सव समितीमध्ये झाले; पण महासंघाचा मानाचा गणपती याच शेवरलेट गाडीतून नेला जात असे. संग्रामसिंह चौहान यांच्यानंतर त्यांचा मुलगा सुरेंद्रसिंह यांनी या गाडीला मुलासारखे सांभाळले. त्यांनी अनेक वर्षे हे वाहन श्री विसर्जन मिरवणुकीत चालविले. मागील २२ वर्षांपासून त्यांचा मुलगा सचिन हा मानाच्या गणपतीच्या गाडीचा सारथी बनला होता. सचिनचे १४ जून २०१२ रोजी आकस्मिक निधन झाले. सचिनच्या पश्चात ही परंपरा कायम राखण्यासाठी त्याचे वडील सुरेंद्रसिंह चौहान यांनी पुन्हा एकदा गाडीचे स्टेअरिंग हाती घेतले होते. मात्र, आता वयोमानाप्रमाणे त्यांना गर्दीतून वाहन चालविणे व तासन्तास एकाच ठिकाणी बसणे जमत नाही. यामुळे त्यांनी श्री विसर्जन मिरवणुकीत इतिहास घडविणाऱ्या शेवरलेट गाडीची सेवा बंद केली. विसर्जन मिरवणुकीचा दिवस जसा जवळ यायचा तशी सचिन चौहानची जोरात तयारी सुरू व्हायची. शेवरलेट गाडीची सर्व्हिसिंग करणे, तिला नवा रंग देणे, गाडी शहरात चालवून बघणे व विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी फुुलांनी गाडी सजविणे व गणेश महासंघाच्या मानाच्या गणपतीला मिरवणुकीतून नेणे हा सचिनचा दरवर्षीचा क्रम ठरलेला होता. हसतमुख चेहऱ्याच्या सचिनची मागील वर्षापासून श्री विसर्जन मिरवणुकीत महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनाच नव्हे तर गणेशभक्तांनाही आठवण येते.