शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
3
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
4
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
5
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
6
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
7
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
8
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
9
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
10
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
11
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
12
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
13
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
14
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
15
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
16
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
17
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
18
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
19
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका शाळांचा निकाल २७ टक्क्यांनी वाढला

By admin | Updated: June 18, 2014 01:35 IST

औरंगाबाद : महापालिका शाळांतील दहावीचा निकाल २७ टक्क्यांनी वाढला. गेल्या वर्षी ५३ टक्के निकाल लागला होता. यावर्षी ८०.१६ टक्के इतका निकाल लागला आहे.

औरंगाबाद : महापालिका शाळांतील दहावीचा निकाल २७ टक्क्यांनी वाढला. गेल्या वर्षी ५३ टक्के निकाल लागला होता. यावर्षी ८०.१६ टक्के इतका निकाल लागला आहे. ८०-८५ टक्क्यांपर्यंत गुण घेणाऱ्या ७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी ए. एम. शेख यांनी सांगितले.मिटमिटा शाळेचा निकाल १०० टक्के तर शहाबाजार उर्दू शाळेचा निकाल ९५ टक्के लागला आहे. दोन शाळांचा निकाल ५० टक्क्यांहून खाली आला आहे. मनपा शाळेतून ३८३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेस बसले. त्यातील ३०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. २२ विद्यार्थी ७५ टक्क्यांहून अधिक, २७ विद्यार्थी ७० टक्क्यांहून, तर ८८ विद्यार्थी ६० टक्क्यांहून अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. आयुक्तांनी केलेले प्रयत्न, तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे परिश्रम, विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासामुळे मनपा शाळांचा टक्का वाढला आहे. यांना मिळणार बक्षीस...मिलिंद रामेश्वर दाभाडे ८५ टक्के, शुभम् बाबासाहेब दाभाडे ८१ टक्के, खान आमेर अय्युब ८१ टक्के, शे.फरिना राजमंहमद शेख ८१ टक्के, शे.सुमानिया फेरोज ८०.८० टक्के यांच्यासह आणखी दोन विद्यार्थ्यांना ५० हजारांचे बक्षीस मिळणार आहे. तसेच १६ विद्यार्थ्यांना प्रत्येक ३५ हजारांचे बक्षीस मिळणार आहे. ५८ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ३ हजारांचे बक्षीस २१ जून रोजी होणाऱ्या कार्यक्रमात आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते देण्यातयेईल. उद्या १८ जून रोजी आयुक्तांच्या हस्ते उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार होईल, असे शिक्षणाधिकारी शेख यांनी सांगितले. शिक्षणमंत्र्यांकडून अभिनंदनपालिका शाळांचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढला आहे. शाळांचा निकाल चांगला लागल्याबद्दल शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांचे फोनवरून अभिनंदन केले. महापालिकेच्या शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणखी कशी मजबूत करता येईल, या दृष्टीने गांभीर्याने विचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.