बारावीचा निकाल ८९ टक्के
By Admin | Updated: June 3, 2014 00:42 IST2014-06-03T00:34:11+5:302014-06-03T00:42:30+5:30
परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत परभणी जिल्ह्याचा निकाल ८९.१२ टक्के लागला.

बारावीचा निकाल ८९ टक्के
परभणी: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत परभणी जिल्ह्याचा निकाल ८९.१२ टक्के लागला. टक्केवारीत परभणी जिल्हा विभागात पाचव्या स्थानावर फेकला गेला. सोमवारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्याची टक्केवारी वाढली असली तरी विभागात मात्र जिल्ह्याची घसरण झाली आहे. परभणी जिल्ह्यातून १७ हजार २५६ विद्यार्थ्यांी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी १७ हजार २१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात १५ हजार ३४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १ हजार ४२७ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. तर ७ हजार ४६९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ६ हजार १५९ द्वितीय द्वितीय श्रेणीत तर २८५ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेचा निकाल ९३.४४ टक्के लागला आहे. तर कला शाखेचा ८४.७२, वाणिज्य शाखेचा ९१.४७ आणि व्यावसायिक शाखेचा निकाल ८८.१८ टक्के लागला. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील २५ महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल जिल्ह्यात २१३ उच्च माध्यमिक विद्यालय आहेत. त्यापैकी २५ महाविद्यालयांचा निकाल पैकीच्या पैकी म्हणजे १०० टक्के लागला आहे. १०० टक्के निकाल लागणारी महाविद्यालये अशी- मॉडेल इंग्लिश आर्ट, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज परभणी, राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय, परभणी, नृसिंह उच्च माध्यमिक विद्यालय, पोखर्णी नृ., विश्वशांती ज्ञानपीठ उच्च माध्यमिक विद्यालय रहाटी, जिजाऊ ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय, परभणी, कै.रंगनाथराव काळदाते उच्च माध्यमिक विद्यालय, सरस्वती (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव खु., माऊली ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय, परभणी, तुबा कनिष्ठ महाविद्यालय परभणी, ज्ञानसाधना महिला कनिष्ठ महाविद्यालय, परभणी, विकास भारती गुरुकुल (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय इंद्रायणी, श्री.चक्रधर स्वामी उच्च माध्यमिक विद्यालय धार, संबोधी उच्च माध्यमिक विद्यालय परभणी, माऊली ज्ञानतीर्थ कनिष्ठ महाविद्यालय, टाकळी कुंभकर्ण, छत्रपती शाहू उच्च माध्यमिक विद्यालय प्रभावतीनगर, सना उर्दू माध्यमिक विद्यालय पूर्णा आणि सोमेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय गौर, कै.सूर्यभानजी (स्वतंत्र) पवार कनिष्ठ महाविद्यालय पूर्णा, कै.गणेशराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय, भोगाव, प्रभूकृपा उच्च माध्यमिक विद्यालय वाघी बोबडे, साईकृपा कनिष्ठ महाविद्यालय बोरी, नृसिंह कनिष्ठ महाविद्यालय मंगरुळ ता.मानवत, ज्ञानोपासक कला उच्च माध्यमिक विद्यालय रेणापूर ता. पाथरी, नितीन उच्च माध्यमिक विद्यालय, आहेरबोरगाव ता. सेलू आणि स्वामी समर्थ (स्वतंत्र) कनिष्ठ महाविद्यालय चिकलठाणा बु. जिल्ह्यात सेलू अव्वल परणभी जिल्ह्याचा निकाल ८९.१२ टक्के लागला असून जिल्ह्यामध्ये सेलू तालुक्याचा निकाल सर्वाधिक आहे. या तालुक्याचा निकाल ९४.०४ टक्के लागला. त्या खालोखाल जिंतूर तालुक्याचा ९१.६१, परभणी तालुक्याचा ९१.४२, पालम ८८.१६, पाथरी ८४.६६, गंगाखेड ८४.५१, पूर्णा ८३.८६ आणि मानवत तालुक्याचा निकाल ८१.४१ टक्के लागला आहे. मुलींचीच बाजी यावर्षीच्या निकालावरही मुलींचे वर्चस्व दिसून आले. जिल्ह्यातील मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९२.३७ टक्के आहे. तर मुलांचे ८७.३५ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातून ६ हजार ६६ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ५ हजार ६०३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर ११ हजार १४७ मुलांपैकी ९ हजार ७३७ मुले उत्तीर्ण झाले. तालुकानिहाय निकालात मुलीच आघाडीवर आहेत. परभणी तालुक्यात ९३.६२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. पूर्णा ८९.५५, गंगाखेड ८९.२२, पालम ९२.४०, सोनपेठ ९०.६४, जिंतूर ९४.११, पाथरी ८७.७८, मानवत ८८ तर सेलू तालुक्यात मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ९६.३५ टक्के एवढे आहे.