शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीच्या घरात थकबाकी

By admin | Updated: November 23, 2014 00:25 IST

राजेश खराडे , बीड महावितरणची थकबाकी वसुली करण्याची ग्राहकांबरोबर महावितरण कंपनीचीही मानसिकता दिसून येत नाही. कोट्यवधीच्या घरात थकबाकी असतानाही महावितरण कंपनीकडून

राजेश खराडे , बीड महावितरणची थकबाकी वसुली करण्याची ग्राहकांबरोबर महावितरण कंपनीचीही मानसिकता दिसून येत नाही. कोट्यवधीच्या घरात थकबाकी असतानाही महावितरण कंपनीकडून कोणती वसुली मोहीम राबविण्यात येत नाही. वसुलीकरिता स्वतंत्र विभागही नेमण्यात आलेला नाही. वसुलीचे काम हे लाईनमनवरील कामगारावरच अवलंबून असते. याकडे सर्व्हे, ग्राहकांची नवीन कनेक्शन, वीज चोरीवर आळा घालणे, जनित्राची दुरुस्ती, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण आणि मिळालाच वेळ तर वसुली केली जाते. त्यामुळे कामाचा अतिरीक्त ताण असल्यानेच वसुली होत नसल्याचे येथील लाईनमनने सांगितले. बीड जिल्ह्यात बीड विभाग व अंबाजोगाई असे दोन विभाग आहेत. बीड विभागात ८५० तर अंबाजोगाई विभागात ८०० कामगार आहेत. भौगालिक रचनेनुसार एका कामगाराकडे ४ गावे व ८ वस्त्याचा कारभार असल्याने वसुलीकडे दुर्लक्ष होत आहे. महावितरणकडून वसुलीकरिता कोणती मोहीम राबवली जात नाही तर वरिष्ठांकडून तगादा लावल्यावर वसुली केली जाते. सध्या बीड विभागाकडे सर्वाधिक थकबाकी असल्याने महिनाभर वसुली मोहिमच राबवली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कामगारांवर कामाचा अरिरीक्त ताण असल्याने वसुलीत सुसुत्रता येत नाही. एकाच कामगारावर ४ जनित्राचे काम केले जाते. एका जनित्रावर सरासरी ८० ते १०० ग्राहकांचा समावेश असतो. ग्राहकांच्या तक्रारी, नवीन कनेक्शन इत्यादी कामाचा ताण येत असल्यानेच वसुलीच्या थकबाकीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कर्मचाऱ्यांवर अतिरीक्त कामाचा भार कर्मचाऱ्यांवर वसुलीबरोबरच परिसरातील सर्व्हे, नवीन कनेक्शन देणे, ग्राहकांच्या तक्रारीचे निवारण करणे, जनित्राची दुरुस्ती करून चार-चार गावांतील वसुली करावी लागत आहे. अतिरीक्त कामाचा भार असल्याने वसुलीत सातत्य राहत नसल्याचे लाईमन यांनी सांगितले. महावितरण कंपनीकडून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वसुली मोहीम व वीज चोरीला आळा बसण्यासाठी शहरातून व ग्रामीण भागात मोहीम राबवली जात. यामधून वसुलीत वाढ होऊन वीज चोरीलाही आळा बसत होता. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून ही मोहीम बंद असल्याने थकबाकीत वाढ होत आहे.