शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सन्मानाने अध्यक्ष व निवडणुकीने सहअध्यक्ष निवडा

By admin | Updated: July 30, 2014 01:18 IST

औरंगाबाद : साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना होणारे वाद टाळण्यासाठी साहित्य महामंडळाने एका ज्येष्ठ साहित्यिकाची सन्मानाने नियुक्ती करावी

औरंगाबाद : साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडताना होणारे वाद टाळण्यासाठी साहित्य महामंडळाने एका ज्येष्ठ साहित्यिकाची सन्मानाने नियुक्ती करावी व निवडणुकीने सहअध्यक्षांची निवड करावी, असा फार्म्युला पंजाबातील घुमान येथे होणाऱ्या नियोजित ८८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतील उमेदवार भारत सासणे यांनी सुचविला आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाची निवड सन्मानाने व्हावी, असे आपले मत असल्याचे सांगून भारत सासणे म्हणाले, जोपर्यंत सन्माननीय तोडगा निघत नाही, तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया अपरिहार्य आहे; परंतु यावर एक उपाय मी महामंडळास सुचविला आहे. महामंडळाने एका सन्माननीय साहित्यिकाची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करावी व निवडणुकीच्या मार्गाने सहअध्यक्ष निवडावा. एका मंचावर दोन अध्यक्ष असल्याने काहीही फरक पडणार नाही. उलट साहित्यप्रेमींचा फायदाच होईल व साहित्यिकांतील हेवेदावे, वाद संपुष्टात येतील. महामंडळाने मी सुचविलेल्या सूचनेवर अद्याप काहीही निर्णय घेतलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठी साहित्यातील एक अग्रगण्य लेखक, ज्यांच्या साहित्याला बहुसंख्य संस्था, महाराष्ट्र फाउंडेशन, लाभशेटवार आणि महाराष्ट्र शासनाचे तब्बल ७ पुरस्कार मिळालेले आहेत व ज्यांची ४० हून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत, असे वाचकप्रिय लेखक भारत सासणे मंगळवारी मराठवाडा साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने औरंगाबादेत आले होते. मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे वसमत येथे गेल्या वर्षी आयोजित ३५ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष आहेत. यावेळी ते लोकमतशी बोलत होते. सासणे म्हणाले, महाराष्ट्रातून नामदेव पंजाबातील घुमानला गेले. आता ७०० वर्षांनंतर महाराष्ट्रातील १० हजारांहून अधिक साहित्यिक व साहित्यप्रेमी घुमानला जाणार आहेत. या क्षणाचा साक्षीदार होतानाच आपल्या जाणिवा व साहित्यविषयक विधायक भूमिका मांडण्याची संधी घेण्यासाठीच मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरलो आहे. या पदासाठी मी पात्र असून मराठवाड्यातील साहित्यप्रेमींनी मला ही संधी मिळवून द्यावी, असे आवाहन यानिमित्ताने मी करतो आहे. महामंडळाकडून मतदार याद्या प्रसिद्ध होताच आपण सर्वांशी संपर्क साधून विजयी करण्याचे आवाहन करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मंचसाहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा मराठी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मंच असून त्याला मोठा आदरही आहे. या मंचावरून उत्तुंग, महनीय व्यक्तींनी आपले विचार, भूमिका मांडली आहे. त्यावर चर्चा आणि विचारमंथनही झाले आहे. या मंचावरून विचार मांडण्याची संधी ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीने मिळते. त्यामुळेच या निवडणुकीत मी उडी घेतली आहे, असे मत सासणे यांनी व्यक्त केले.४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध ४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध असलेले भारत सासणे यांची आगामी काही दिवसांत मौज प्रकाशनतर्फे दीर्घ कथासंग्रह, मॅजेस्टिक प्रकाशनतर्फे वैचारिक लेखसंग्रह, बालसाहित्यांची दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. मूळ जालना येथील रहिवासी असलेले भारत सासणे प्रशासकीय सेवेतून नुकतेच सेवानिवृत्त झाले असून, पुण्यात स्थायिक झाले आहेत.