शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

मुलांच्या जडणघडणीसंदर्भातील शंकांचे निरसन

By admin | Updated: March 1, 2015 00:08 IST

औरंगाबाद : लहान मुलांच्या जडणघडणीसंदर्भात असणाऱ्या अनेक शंका आणि समज याची उत्तरे शनिवारी अनेक पालकांना मिळाली. मुंबईच्या मनोचिकित्सक व समुपदेशक फातिमा राशीद

औरंगाबाद : लहान मुलांच्या जडणघडणीसंदर्भात असणाऱ्या अनेक शंका आणि समज याची उत्तरे शनिवारी अनेक पालकांना मिळाली. मुंबईच्या मनोचिकित्सक व समुपदेशक फातिमा राशीद यांनी पालकांना पाल्यांच्या वागण्यासंदर्भात पडणाऱ्या प्रश्नांची योग्य आणि समाधानकारक उत्तरे एका सादरीकरणाद्वारे दिली. ‘लोकमत’ आणि ‘युनिव्हर्सल हायस्कूल’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘यशस्वी पालकत्व परिसंवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फातिमा राशीद बोलत होत्या. यावेळी काही महिलांनी ‘माझा मुलगा माझे ऐकतच नाही,’ ‘त्याने माझे ऐकावे यासाठी मी काय करू,’ असे प्रश्न फातिमा यांना विचारले असता त्यांनी छोटी छोटी उदाहरणे देऊन मुलांना छोट्या छोट्या शिक्षा देण्याचा सल्ला दिला. मुलांना शिस्त लावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले. माझा मुलगा, मुलगी संगणक व मोबाईल फोनला सतत चिकटलेला असतो? मला माझ्या पाल्यांच्या संरक्षण तसेच अभ्यासाबद्दल खूप काळजी वाटते, असे अनेक प्रश्न यावेळी पालकांनी विचारले. फातिमा यांनी सादरीकरणाद्वारे उत्कृष्ट मार्गदर्शन केले. वाचन, लेखन या कौशल्यांचा अभ्यासक्रमात समावेश करणे आवश्यक आहे़ म्हणूनच एकविसाव्या शतकातील मुलांची जडणघडण करताना पालक व शिक्षकांना वेळोवेळी उपयुक्त व आवश्यक अशा वृत्ती व कौशल्यांमध्ये पारंगत करणे गरजेचे आहे, यावर युनिव्हर्सल हायस्कूलचा ठाम विश्वासआहे़ युनिव्हर्सल हायस्कूल ही प्रतिष्ठित युनिव्हर्सल एज्युकेशन या समूहाचा भाग आहे़ सदर संस्थेचा विस्तार मुंबई, बंगळुरू, नाशिक, शारजाह आणि दुबई येथे झालेला आहे़