रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण

By संतोष हिरेमठ | Updated: July 22, 2022 16:51 IST2022-07-22T16:49:47+5:302022-07-22T16:51:17+5:30

गेल्या ८ दिवसापासून रुग्णावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना आज दुपारी रुग्णाचा मृत्यू झाला.

Resident doctor assaulted at Ghati Hospital Aurangabad after death of patient | रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण

रुग्णाच्या मृत्यूनंतर घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांना मारहाण

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याविषयी मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अक्षय क्षीरसागर यांनी सांगितले की,  मेडिसिन विभागाचे प्रथम वर्षाच्या डॉक्टरांना मारहाण करण्यात आली. वॉर्ड क्रमांक -४ मध्ये ही मारहाण झाली. एका रुग्णाच्या मेंदूत रक्तस्त्राव झालेला होता. त्यामुळे पॅरालिसिस झाला होता. रुग्णाची प्रकृती गंभीर होती. गेल्या ८ दिवसापासून उपचार सुरू होते. डॉक्टरांकडून प्रयत्न सुरू होते. उपचार सुरू असताना आज दुपारी रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णाला डॉक्टरांनी मृत घोषित करताच मुलानी त्यांना मारहाण केली.

Web Title: Resident doctor assaulted at Ghati Hospital Aurangabad after death of patient