शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

‘रेरा’मुळे बांधकाम क्षेत्रात वाढतोय ‘विश्वास’; नोंदणीकृत गृहप्रकल्पांनाच राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 6:37 PM

‘रियल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ (रेरा)मुळे बांधकाम क्षेत्रात आणखी पारदर्शकता निर्माण झाल्याने गृहेच्छुकांचा विश्वास वाढत आहे.

ठळक मुद्दे दर महिन्याला शहरात ७०० पेक्षा अधिक फ्लॅट, रो-हाऊस, दुकाने आदींची विक्री होत आहे.

औरंगाबाद : ‘रियल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅक्ट’ (रेरा)मुळे बांधकाम क्षेत्रात आणखी पारदर्शकता निर्माण झाल्याने गृहेच्छुकांचा विश्वास वाढत आहे. जिल्ह्यात ६५० गृहप्रकल्पांची रेरामध्ये नोंदणी झाल्याचे क्रेडाईने बुधवारी जाहीर केले आहे. 

अनधिकृत बांधकामावर टाच आणण्यासाठी, बांधकाम व्यावसायिकांच्या मनमानी कारभाराला रोखण्यासाठी व गृहेच्छुकांच्या हितासाठी केंद्राने २५ मार्च २०१६ रोजी रियल इस्टेट रेग्युलेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट हा कायदा आणला.त्यानंतर १ मे २०१७ रोजी राज्य सरकारने ‘रेरा’ची अंमलबजावणी सुरू केली.ग्राहक हिताच्या विविध तरतुदींमुळे ग्राहक आता ‘रेरा’ नोंदणीकृत गृहप्रकल्पातच लक्ष घालत आहेत. यामुळे शहरातील विनानोंदणीकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचे दिसून येत आहे. 

विनानोंदणी बांधकामांना आळा रेरामुळे ग्राहकांचा बांधकाम क्षेत्रावरील विश्वास वाढला आहे. दर महिन्याला शहरात ७०० पेक्षा अधिक फ्लॅट, रो-हाऊस, दुकाने आदींची विक्री होत आहे. ‘रेरा’मुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना आळा बसला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांप्रमाणेच खाजगी बँकांनीही विना नोंदणीकृत गृहप्रकल्पांना गृहकर्ज देऊ नये. -रवी वट्टमवार, अध्यक्ष, क्रेडाई, औरंगाबाद. 

दरमहा २०० पेक्षा अधिक गृहकर्ज राष्ट्रीयीकृत बँका ‘रेरा’त नोंदणी असलेल्या घरांनाच गृहकर्ज मंजूर करीत आहेत. यामुळे ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. सध्या एसबीआय दर महिन्याला शहरात २०० पेक्षा अधिक गृहकर्ज मंजूर करीत आहे. - सुनील शिंदे, सहायक महाव्यवस्थापक, एसबीआय

‘रेरा’कडे सत्यता तपासणीसाठी यंत्रणा नाही  ग्राहक ‘रेरा’मध्ये त्या गृहप्रकल्पाची नोंद आहे का, याची खात्री करून घेत आहेत; मात्र बांधकाम व्यावसायिकांनी ‘रेरां’तर्गत भरलेली माहिती सत्य आहे का, याची तपासणी करण्यासाठी सध्या कोणतीही प्रबळ यंत्रणा नाही. ग्राहकांच्या तक्रारीच्या आधारावरच राज्यात तुरळक कारवाई करण्यात आली आहे.  - अ‍ॅड. आनंद उमरीकर, कायदेविषयक सल्लागार  

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017Aurangabadऔरंगाबादbankबँक