शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

दुरुस्तीच्या निधीतून दालन सजविले !

By admin | Updated: July 13, 2014 00:17 IST

केज : पंचायत समितीच्या इमारतीला पावसाळ्यात गळती लागल्याने कौलारु बदलण्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून सभापती आणि गटविकास अधिकारी यांचीच दालने पीओपी करुन सजविण्यात आली़

केज : निजामकालीन, पुरातन आणि जुनाट झालेल्या पंचायत समितीच्या इमारतीला पावसाळ्यात गळती लागल्याने कौलारु बदलण्यासाठी मंजूर झालेल्या निधीतून सभापती आणि गटविकास अधिकारी यांचीच दालने पीओपी करुन सजविण्यात आली़ इमारत दुरुस्तीसाठी आलेला निधी हडप करण्याचा डाव टाकण्यात आला़ त्यामुळे इमारत दुरुस्तीसाठी आलेल्या निधीतून इमारतीचीच दुरुस्ती व्हावी, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे़पंचायत समिती कार्यालयाची इमारत निजामकालीन आहे़ पावसाळ्याच्या दिवसात या इमारतीला गळती लागते़ त्यामुळे या इमारतीवरील कैलार बदलण्यासाठी व इमारत दुरूस्तीसाठी सन २०१२-१३ मध्ये अ-प्रशासन या लेखा शिर्षाअंतर्गत ७ लाख ५० हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे़ परंतु पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि सभापती यांच्या दालनाला पी़ओ़पी़ करून इमारत दुरूस्ती करण्याऐवजी हा निधी यातच खर्ची केल्याचे भासवून तो हडप करण्याचा डाव आखण्यात आला असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा सरचिटणीस दत्ता धस यांनी केला आहे़इमारत दुरूस्तीसाठी आलेल्या निधीतून इमारतीची दुरूस्तीच झाली पाहिजे, नसता पंचायत समितीला कुलूप ठोकण्याचा इशाराही धस यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे़इमारत दुरुस्तीसाठीच निधीपंचायत समिती केज इमारतीच्या दुरुस्तीसाठी ७ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ पंचायत समिती सभागृहाची मान्यता घेऊन हा निधी खर्च करण्यात आला पाहिजे, असे जि़ प़ सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस़ डी़ भारती यांनी सांगितले़दोन दिवसांत पत्रे बदलणारया प्रकरणी गटविकास अधिकारी आऱ डी़ गर्जे म्हणाले की, या कामाला मान्यता मिळाली आहे़ दोन दिवसांमध्ये प्रत्यक्ष पत्रे बदलण्याच्या कामाला सुरुवात करुन काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल़ (वार्ताहर)५७ कर्मचाऱ्यांचा जीव मुठीतपावसाळ्यात या इमारतीला गळती लागते़ त्यामुळे गेल्या वर्षी कौलारुच्या इमारतीवरुन प्लास्टिकचा कागद टाकला होता़ परंतु यावर्षी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे ५७ कर्मचारी पावसाळ्यात गळती लागल्यामुळे आपापला जीव मुठीत धरुन काम करीत आहेत़ या इमारतीची दुरुस्ती तात्काळ करावी, अशी मागणी कर्मचारी वर्गामधून होत आहे़