नावानिशी तक्रार द्या, निलंबित करू...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 00:58 IST2018-06-04T00:57:55+5:302018-06-04T00:58:12+5:30

बदल्यांमध्ये अन्याय झाला, ज्येष्ठता याद्या जाहीर केल्या नाहीत, बोगस प्रमाणपत्रे तपासली नाहीत, शिक्षकांनी असे चुकीचे आरोप करूनयेत. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले.

Report clearly, I will take action | नावानिशी तक्रार द्या, निलंबित करू...

नावानिशी तक्रार द्या, निलंबित करू...

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : बदल्यांमध्ये अन्याय झाला, ज्येष्ठता याद्या जाहीर केल्या नाहीत, बोगस प्रमाणपत्रे तपासली नाहीत, शिक्षकांनी असे चुकीचे आरोप करूनयेत. खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ज्या शिक्षकांची बदली झाली आहे, अशा शिक्षकांची नावानिशी तक्रार करा. त्याची शहानिशा करून दोषींना तात्काळ निलंबित केले जाईल, असे शिक्षणाधिकारी एस.पी. जैस्वाल म्हणाले.
बदलीमुळे अन्याय झालेल्या शिक्षकांची बैठक शनिवारी औरंगाबाद शिक्षक सोसायटी कार्यालयात झाली. या बैठकीत शिक्षकांनी केलेल्या आरोपांचे खंडण करताना शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, जिल्ह्यातील ८ हजार शिक्षकांनी बदलीसाठी आॅनलाईन अर्ज केले होते. यापैकी साडेतीन हजार शिक्षकांच्या बदल्या झाल्या. बदली झालेल्या शिक्षकांची एवढी मोठी संख्या असून कोणाकोणाची प्रमाणपत्रे तपासायची. बिनबुडाचे आरोप न करता आमच्याकडे थेट नावानिशी तक्रार द्या, त्याची विनाविलंब चौकशी करू व दोषी आढळल्यास, त्या शिक्षकाला तात्काळ निलंबित करू.
मराठवाडा शिक्षक कृती समितीचे निमंत्रक दिलीप ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शेकडो शिक्षकांनी बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे गा-हाणे मांडले. पती-पत्नी शिक्षक, कनिष्ठ शिक्षक तसेच एकल शिक्षकांवर अन्याय झाले आहेत. संवर्ग- १ व संवर्ग- २ मध्ये अनेक शिक्षकांनी बोगस प्रमाणपत्रांच्या माध्यमातून, तर अनेकांनी चुकीचे अंतर दाखवून बदलीचा लाभ घेतलेला आहे. बदली करताना शिक्षकांची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरण्यात आलेली नाही, असे आरोप पुराव्यासह शिक्षकांनी केले.

Web Title: Report clearly, I will take action