शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 11:40 IST

वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला असून, यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती संभाजीनगर: विकासाचा मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरजवळच्या सावंगी ते जांभळा इंटरचेंजदरम्यान महामार्गावर अज्ञात व्यक्तींनी शेकडो खिळे ठोकल्याचे मंगळवारी रात्री आढळून आले आहे. यामुळे अनेक वाहनांचे टायर पंक्चर झाले असून, या खिळ्यांमुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने मोठा अपघात टळला असून, यामुळे वाहनचालकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती सुरू होती की  हा घातपाताचा प्रयत्न होता असा सवाल उपस्थित होत आहे.

हा प्रकार काही वाहनधारकांनी घटनास्थळापासून व्हिडिओ करून समोर आणला. व्हिडिओमधील माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वाहने प्रचंड वेगाने धावत असतात. अशातच, रस्त्याच्या काही भागावर हे खिळे ठोकण्यात आले होते. विशेष म्हणजे, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सूचना नव्हती, किंवा रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याचा फलकही लावलेला नव्हता. त्यामुळे, अनेक वाहनचालकांना या खिळ्यांचा अंदाज आला नाही आणि त्यांच्या गाड्यांचे टायर पंक्चर झाले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समृद्धी महामार्गावर असे प्रकार याआधीही घडले आहेत. त्यामुळे, प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून घातपाताचा प्रयत्न?समृद्धी महामार्गावरील ही घटना केवळ अपघात किंवा निष्काळजीपणा नसून, त्यामागे घातपाताचा किंवा लुटमारीचा उद्देश असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या पद्धतीने रस्त्यावर शेकडो खिळे ठोकले गेले होते, ते पाहता हा एखाद्या कटाचा भाग वाटतो. या खिळ्यांमुळे गाड्यांचे टायर पंक्चर झाल्यानंतर चालक मदतीसाठी थांबतो, अशा वेळी त्यांना लुटण्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. यामुळे, हा फक्त अपघात नसून, वाहनचालकांना अडकवून त्यांना लुटण्याचा पूर्वनियोजित कट होता का, याचा तपास होणे गरजेचे आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे वाहनधारकांनी म्हंटले आहे. दरम्यान, काहींच्या मते हे खिळे नसून छोटे नोजल्स आहेत, या द्वारे महामार्ग दुरुस्तीसाठी केमिकल सोडण्यात येत होते. मात्र, याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्हया घटनेमुळे प्रवाशांनी समृद्धी महामार्गाच्या प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 'अधिकारी आणि कंत्राटदारांना लोकांच्या जिवाची पर्वा नाही का?' असा सवाल अनेक वाहनचालकांनी विचारला आहे. काही वाहनचालकांनी प्रसंगावधान राखून मागून येणाऱ्या गाड्यांना सूचना देऊन सावध केले, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. 

पोलिसांचे सहकार्य नसतेया घटनेचा अनुभव घेतलेल्या संतोष सानप नावाच्या प्रवाशाने सांगितले की, "मी कुटुंबासोबत जालना येथून पनवेलला जात होतो. माझ्या गाडीसोबत अनेक गाड्यांचे टायर पंक्चर झाले. यापूर्वीही माझ्यासोबत असे घडले आहे. याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावरही कोणतेही सहकार्य मिळत नाही. प्रशासन आणि कंत्राटदार नेमके काय करत आहेत?"

अफवांवर विश्वास ठेवू नकासमृद्धी महामार्गावरील ५४ किमीच्या पॅचच्या नियमित देखभाल आणि दुरुस्तीचे काम सुरू मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. लेननंबर १ वर काम सुरू होते. लेन २, ३ सुरू होते. यासाठी नोजल्स बसवून त्याद्वारे केमिकल त्यातून सोडत महामार्गाचे आयुष्य वाढवले जाते. मंगळवारी सकाळी या ठिकाणी लावण्यात आले होते, त्यानंतर २४ तासांनी काम झाल्यानंतर ते काढण्यात आले आहे. दरम्यान, मध्यरात्री येथे दुरुस्ती सुरू असलेल्या लेनमधून गाड्या गेल्याने पंक्चर झाल्या. घटना झाली तेव्हा लागलीच एचएसपी आणि दौलताबाद पोलिस दाखल झाले. यापुढे जेव्हा देखभाल आणि दुरुस्तीचे कामे करण्यात येतील त्यावेळी रिफ्लेक्टर, बॅरीकेट लावून कामे होतील याची काळजी घेण्यात येईल. अफवांवर विश्वास ठेवू नका.- प्रशांत स्वामी, पोलिस उपायुक्त

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAccidentअपघात