शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

कोरडा दिवस हिवताप रोखण्याचा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 23:25 IST

हिंगोली : सध्या जिल्हाभरात पाणीटंचाईचे संकट आहे. मात्र अल्प सांडपाण्यामुळेही डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे.

हिंगोली : सध्या जिल्हाभरात पाणीटंचाईचे संकट आहे. मात्र अल्प सांडपाण्यामुळेही डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे टंचाईच्या काळातही कोरडा दिवस पाळल्यास डासांमुळे होणारे आजार टाळता येणे शक्य होणार आहे. हिवतापाचा प्रसार हा ‘अ‍ॅनाफिलिस’ डासांच्या मादीमार्फत होत असतो. या डासांची उत्पत्ती ही स्वच्छ साठवून ठेवलेल्या पाण्यात होत असते. विशेष करुन भातशेती, स्वच्छ पाण्याची डबकी, नाले, नदी, पाण्याच्या टाक्या, कालवे आदीमध्ये या डासांची उत्पत्ती होत असते. ‘अ‍ॅनाफिलिस’ डासांची मादी हिवताप झालेल्या रुग्णास चावल्यास रुग्णांच्या रक्ताबरोबर हिवतापाचे जंतू डासांच्या पोटात जावून तेथे वाढ होऊन डासांच्या लाळेवाटे निरोगी मनुष्याच्या शरीरात सोडले जातात. तेव्हा निरोगी मनुष्याच्या शरीरात हे जंतू यकृतामध्ये गेल्यानंतर तेथे त्यांची वाढ होऊन मनुष्यास दहा ते बारा दिवसांनी अचानक थंडी वाजण्यास सुरुवात होते. विविध गावातील जानेवारी महिन्यात १५ रक्तजल नमुने तपासणीस नांदेडच्या प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळणे व किटकशास्त्रीय तपासणीही केली. हिवताप कार्यालयाकडे धूर फवारणीची दहा यंत्रे उपलब्ध आहेत. हिवताप लक्षणे आढळल्यास प्राथमिक किंवा आरोग्य उपकेंद्रांच्या सल्यानुसार औषधी घेण्याचे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण यांनी केले आहे. हिवताप, डेंग्यू- चिकुनगुनिया हे सर्व रोग स्वच्छ पाण्यातील डासांपासून होतात. कोरडा दिवस पाळल्यास त्यांची उत्पत्ती रोखणे शक्य आहे. घाण पाण्यात ‘क्युलेक्स’ डासाची मादी अंडी घालते व त्यापासून हत्तीरोगाची लागण होते. त्यामुळे आपल्या परिसरातील सर्व नाल्या वाहत्या होतील, डबकी, खड्ड्यात पाणी साचून राहणार नाही. याची काळजी घेतली तर हिवताप डेंग्यु, चिकुनगुनिया, हत्तीरोग होण्याचे टाळता येणे शक्य आहे.(प्रतिनिधी)