शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा भारनियमन

By admin | Updated: October 1, 2014 00:33 IST

परभणी: विजेची मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने भारनियमन मुक्त झालेल्या परभणीकरांना पुन्हा एकदा वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे.

परभणी: विजेची मागणी व पुरवठा यात तफावत निर्माण झाल्याने भारनियमन मुक्त झालेल्या परभणीकरांना पुन्हा एकदा वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे. ऐन नवरात्रीमध्ये भारनियमन सुरु केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.संपूर्ण राज्यभरात कोठे, किती वीज पाठवायची याचा सर्वस्वी निर्णय ठाणे जिल्ह्यातील एैरोली येथील केंद्राकडून घेतला जातो. गेल्या महिन्यात सर्वत्र पाऊस झाला. यानंतर सध्या कडक उन्हास नागरिक सामोरे जात आहेत. यातच विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. पावसाळ्यात पावसाने काहीसा ताण दिल्यानंतर शेतातील पिकांसाठी शेतकऱ्यांना वीज पुरवठा आवश्यक आहे. या महिन्यात शेतीपंपाच्या अचानक वाढलेल्या वापरामुळे सर्वत्र विजेची मागणी व पुरवठा यात तफावत होत आहे. या कारणास्तव सदरील भारनियमन सुरु करण्यात आले असले तरी महावितरणला नवरात्रीचा विसर पडलेला आहे. सक्तीचे भारनियमन परभणी शहर व ग्रामीण भागात काही दिवसांपासून सुरु करण्यात आले. यात शहरी भागात साडेपाच तास तर ग्रामीण भागात आठ ते नऊ तास भारनियमनास सुरुवात झाली आहे. परभणी शहर विभागाचे १८ फिडर असून यातील आठ फिडर संपूर्णत: भारनियमनमुक्त आहेत. परंतु, या सक्तीच्या भारनियमनात आठ फिडरचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात भारनियमन होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वीज नसताना ग्राहकांना वाढीव वीज बिल आकारण्यात येते. मीटर रिडींग न घेताच आरएनए किंवा डोअर लॉकच्या नावाखाली वाढीव बिल येत आहे. यासाठी ग्राहक बिलाची रक्कम कमी करण्यासाठी कार्यालयाचे खेटे मारत आहेत. तर काही जणांना पूर्ण बिल भरुनही वाढीव बिल, जादा वापर युनिट लावण्यात येत आहेत. अशातच महावितरणने परभणीकरांना पुन्हा भारनियमनाचा दणका दिला आहे. सध्या निवडणुकीची धामधूम व नवरात्रोत्सव या सणासुदीच्या काळात होत असलेल्या भारनियमनाचा फटका मात्र नागरिक व शेतकरी वर्गाला सहन करावा लागत आहे. (प्रतिनिधी)