धार्मिक भावना दुखावल्या नाहीत, ती तर बनावट व्हिडिओ क्लिप

By Admin | Updated: June 16, 2017 20:12 IST2017-06-16T20:12:17+5:302017-06-16T20:12:17+5:30

आमदार अब्दुल सत्तार हे भांडण सोडविण्यासाठी गेले होते. त्या घटनेची कथित बनावट व्हिडिओ क्लिप तयार करून त्यामध्ये छेडछाड

Religious feelings are not hurt, it's a fake video clip | धार्मिक भावना दुखावल्या नाहीत, ती तर बनावट व्हिडिओ क्लिप

धार्मिक भावना दुखावल्या नाहीत, ती तर बनावट व्हिडिओ क्लिप

 ऑनलाइन लोकमत
सिल्लोड, दि. 16 -  आमदार अब्दुल सत्तार हे भांडण सोडविण्यासाठी गेले होते. त्या घटनेची कथित बनावट व्हिडिओ क्लिप तयार करून त्यामध्ये छेडछाड करुन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करुन जातीय तणाव निर्माण व्हावा या हेतूने व्हिडिओ क्लिप व्हायरल केली गेली. 
अब्दुल सत्तार यांनी धार्मिक भावना दुखावल्या नाहीत. ती तर बनावट वीडियो क्लिप आहे  कथित व्हिडिओ क्लिपचे भांडवल करुन काँग्रेस पक्ष व आमदार अब्दुल सत्तार यांना बदनाम करण्याचा कुटील प्रयत्न करीत आहे. असा खुलासा काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश दौड यांनी शुक्रवारी आयोजीत बैठकीत केला.
भाजपच्या नेतृत्वाखाली जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करुन आमदार अब्दुल सत्तार व काँग्रेस पक्षाची बदनामी करण्याचा खेळ खेळल्या जात आहे. दोन समाजामध्ये तणाव निर्माण करणा-या प्रवृत्तीला न रोखल्यास सोमवारी दुपारी 01 वाजेपर्यंत सिल्लोड शहर बंद ठेवण्यात येणार आहे.
सोमवारी सिल्लोड काँग्रेस कमिटीकडून छञपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यापासून मुक मोर्चा काढून तहसील कार्यालयास निवेदन सादर करण्यात येईल अशी माहिती काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेश दौड यांनी दिली.सिल्लोड येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात कार्यकर्ते, नागरिकांची बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गणेशराव दौड, जिल्हा परिषद उपाध्यक्ष केशवराव तायडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयास निवेदन सादर करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षा दुर्गाबाई पवार,उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पालोदकर, उपसभापती नंदकिशोर सहारे, देविदास पाटील लोखंडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
  
दलिताना मारहाण झाली 
सदरील घटनेत अब्दुल सत्तार यांनी भांडण सोडवितांनाचे कोणतेही दृश्य व लक्ष्मण कल्याणकर यांना बेदम मारहाण झाली त्याचे वीडियो दाखविले गेले नसुन त्यामध्ये फक्त कथित शिवीगाळ केल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यावेळी आमदार अब्दुल सत्तार हे भांडण सोडविण्यासाठी गेले नसते तर लक्ष्मण कल्याणकर यांचा निघृन खुन झाला असता.

बंदचे निवेदन दिले 
सिल्लोड तहसील कार्यालयात नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना काँग्रेस कमिटीच्या वतीने सिल्लोड शहर बंद करण्यात येणार असल्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शांतीलाल अग्रवाल,विजय दौड, राजाराम पाडळे, रमेश साळवे, कौतिकराव बडक ,पुंडलिकराव मोरे,सतिष ताठे ,नाना कळम ,डॉ.तानाजी सनान्से, राजु बन्सोड, मनोज जैस्वाल, शांतीलाल बसैय्ये, गजानन महाजन, विठ्ठल जैस्वाल, अशोक पालोदकर, राजेंद्र गौर, दामुआण्णा गव्हाणे,पपिंद्रपालसिंग वायटी , मनोज झंवर, आदींसह नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.

Web Title: Religious feelings are not hurt, it's a fake video clip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.