शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पाणी अन् रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची वणवण; घाटी रुग्णालयातील दृश्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 19:05 IST

रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने घाटीतील विभागीय रक्त केंद्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना पाण्याची बाटली घेऊन पाणी शोधावे लागत आहे. त्याबरोबरच रक्तदान शिबिरांचे प्रमाण कमी झाल्याने घाटीतील विभागीय रक्त केंद्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रक्तासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी रक्तपेढ्यांकडे धाव घ्यावी लागत आहे.

घाटीतील विभागीय रक्त केंद्रात दररोज किमान ५० ते ६० रक्त आणि रक्त घटकांची मागणी असते. परंतु परीक्षेचा कालावधी, वाढता उन्हाचा पारा यामुळे गेल्या काही दिवसांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. त्याचा परिणाम रक्त केंद्रातील साठ्यावर होत आहे. ‘ब्लड इज नाॅट इन स्टाॅक’ असे लिहून देत रुग्णांच्या नातेवाइकांना माघारी पाठविण्याची वेळ ओढवत आहे. त्यामुळे रक्तासाठी घाटीतून खासगी रक्तपेढी गाठण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांवर ओढवत आहे.

दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठीही रुग्णांच्या नातेवाइकांचे हाल होत आहे. घाटीत जागोजागी वाॅटर कूलर बसविण्यात आलेले आहे. परंतु अनेक ठिकाणी पाणी नसल्याने बाटलीबंद पाणी विकत घेण्याची अथवा रिकामी बाटली घेऊन एका वाॅर्डातून दुसऱ्या वाॅर्डात पाण्याची शोधाशोध करण्याची वेळ नातेवाइकांवर ओढवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून घाटी प्रशासनाला पाण्याचे टँकरही मागवावे लागत आहेत.

रक्तदानासाठी पुढे यावेसध्या काही प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. गेल्या दिवसांत शिबिरांचे प्रमाण कमी झाले आहे. गरजू रुग्णांसाठी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदानासाठी पुढे यावे.- डाॅ. भारत सोनवणे, विकृतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी

प्रत्येक वाॅर्डात वाॅटर कूलरप्रत्येक वाॅर्डात वाॅटर कूलर आहेत. त्या स्थितीचा आढावा घेतला जाईल. सध्या पाण्याचीही कमतरता जाणवत आहे. रुग्णालयासाठी टँकर मागविण्यात येत आहे.- डाॅ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक, घाटी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी