शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

वाहनचोरीची वेगळ्या रजिस्टमध्ये नोंद; अपयश झाकण्यासाठी गुन्हे नोंदविण्यास पोलिसांकडून टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 6:20 PM

चोरट्यांकडून वाहने जप्तीनंतर नोंदविले गुन्हे

ठळक मुद्देवाहनचोरीचे गुन्हे पोलिसांनी लपविले वर्षभरापासून शहरात प्रतिदिन सरासरी तीन दुचाकी चोरीला

औरंगाबाद :  वाहनचोऱ्या रोखण्यात पोलीस यंत्रणा कमी पडत आहे. हे अपयश झाकण्यासाठी आता पोलिसांनी वाहनचोरीचे गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ सुरू केल्याचे समोर आले आहे. जून आणि आॅगस्टमध्ये चोरी झालेल्या दुचाकी गुन्हेशाखेकडून चोरट्यांनी हस्तगत केल्याची माहिती मिळाल्यानंतर हर्सूल पोलिसांनी वाहनचोरीचे गुन्हे नोंदविले.  

वर्षभरापासून शहरात  प्रतिदिन सरासरी  तीन दुचाकी चोरटे पळवित आहेत. यासोबतच तीनचाकी रिक्षा, मालवाहू ट्रक आणि कारही चोरीला जात आहेत.  वाहनचोरी रोखण्यासाठी गुन्हेशाखेसोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी काम करणे गरजेचे आहे. याकरीता प्रत्येक ठाण्यात डी.बी. पथक कार्यरत असते. शहरातील सिडको, एमआयडीसी सिडको आणि पुंडलिकनगर पोलीस ठाण्यातील डी.बी. पथकाकडून दुचाकी चोरट्यांविरोधात भरीव कामगिरी सुरू आहे.  गुन्हेशाखेने सहा महिन्यात  दुचाकीचोरीचे ११ गुन्हे उघडकीस आणले. मात्र अन्य पोलीस ठाण्यांकडून वाहनचोरी रोखण्यासाठी ऐवजी गुन्हे नोंदविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे  समोर आले. वाहनचोरीच्या जुन्या घटनांपैकी हर्सूल परिसरातील जहांगीर कॉलनीत राहणाऱ्या शेख शोएब बक्ष शेख अफसर यांचा घरासमोर उभी  मोटारसायकल ( एमएच-४८झेड ४१८९) चोरट्यांनी १० जूनच्या रात्री पळविली होती. तसेच चेतनानगर येथील कडूबा पुंडलिक साळवे यांची मोटारसायकल ( एमए-२०सीडी ७६६९) १८ आॅगस्ट रोजी चोरीस गेली.   ८ सप्टेंबर रोजी गुन्हेशाखेने चोरट्यांकडून या दोन्ही दुचाकी हस्तगत केल्या. यानंतर हर्सूल पोलिसांनी फिर्यादीकडून वाहनचोरीची स्वतंत्र तक्रार नोंदवून घेतली.  टी व्ही सेंटर रस्त्यावरील वाहनतळावर अ‍ॅड. हर्षद भागचंद शिंदे यांनी त्यांची मोटारसायकल (एमएच-२०डीएस ४५३९) चोरट्यांनी चोरून नेली होती. ही घटना २५ आॅगस्ट रोजी दुपारी घडली.  याबाबत त्यांनी ८ सप्टेंबर रोजी जिन्सी ठाण्यात तक्रार नोंदविली. ईस्माईल गौस खान यांची दुचाकी (एमएच-२०सीडी ३८२५) चोरट्यांनी पळविली.  दुसऱ्या दिवशी ईस्माईल खान यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार  नोंदविली.

वाहन चोरीची रजिस्टमध्ये नोंदवाहनचोरीची तक्रार देण्यासाठी ठाण्यात आलेल्या व्यक्तीची तातडीने गुन्हा नोंदवून घेण्याची जबाबदारी ठाणेदाराची असते. मात्र वाहनचोरीची केवळ नोंद एका रजिस्टरमध्ये  केली जात आहे. याकरीता प्रत्येक ठाणेदारांनी असे रजिस्टर ठेवले आहेत . गुन्हाच नोंद न झाल्याने वाहनचोरीचा तपास होत नाही. एवढेच नव्हेतर गाडीचा शोध घ्या असा सल्ला तक्रारदाराला देऊन पोलीस मोकळे होतात.

टॅग्स :bikeबाईकtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस