शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रादिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
2
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
5
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
6
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
7
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
8
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
9
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
10
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
11
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
12
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
13
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
14
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
15
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
16
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
17
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
18
Photos: पहिल्यांदाच बिकिनीत दिसली अपूर्वा नेमळेकर, स्विमिंगपूलमधील हॉट फोटो व्हायरल
19
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
20
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
Daily Top 2Weekly Top 5

८८३ धर्मादाय संस्थांची नोंदणी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:46 IST

जिल्ह्यातील अकार्यरत धर्मादाय संस्थांच्या तपासणीची विशेष मोहीम सध्या सुरू असून, अकार्यरत संस्थांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ८८३ अशा संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.

डॉ. खुशालचंद बाहेती ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्ह्यातील अकार्यरत धर्मादाय संस्थांच्या तपासणीची विशेष मोहीम सध्या सुरू असून, अकार्यरत संस्थांची मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ८८३ अशा संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे.सुमारे २ महिन्यांपूर्वी धर्मादाय सहआयुक्त श्रीकांत भोसले यांनी धर्मादाय संस्थांची माहिती संगणकीकृत करण्याची योजना मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत राबवली. या मोहिमेत सर्व धर्मादाय संस्थांची माहिती २६ कॉलममध्ये भरण्यात आली.यावेळी असे लक्षात आले की, मराठवाड्यातील हजारो धर्मादाय संस्थांनी अनेक वर्षे त्यांचे आॅडिट केलेच नाहीत किंवा तसे धर्मादाय आयुक्त कार्यालयास कळविलेले नाही. यातील काही संस्था १९६५ पासून नोंदणीकृत आहेत.तथापि, त्यांचे अहवाल प्राप्तच नाहीत. एकट्या औरंगाबाद जिल्ह्यात अशा संस्थांची संख्या ६,९०० पेक्षा जास्त आहे, अशा सर्व संस्थांना याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती.या नोटिसीची ३० दिवसांचीमुदत संपल्यानंतर यावर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आलीआहे.या मोहिमेंतर्गत दररोज सुनावणी चालू असून, असमाधानकारक खुलासे देणाºया किंवा खुलासे ना देणाºया अशा संस्थांची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. आतापर्यंत औरंगाबाद जिल्ह्यातील ८८३ अशा संस्थांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. दररोज सुनावणी घेणे व पडताळणी करून अंतिम निर्णय घेण्यासाठी २ महिन्यांचा दररोजचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या कालावधीत औरंगाबाद जिल्ह्यातील ७,००० संस्थांबद्दल निर्णय होईल.मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यांतही ही प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, अशा संस्थांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या नोटिसांची मुदत संपताच विशेष मोहीम सुरू होईल व अकार्यरत किंवा आॅडिट न केलेल्या संस्थांची नोंदणी रद्द होईल. यामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या कामकाजातही सुधारणा होणार असून, उर्वरित संस्थांवर प्रभावी देखरेख करता येणार आहे.