छत्रपती संभाजीनगर: नागपूर येथील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा आणि स्वामी स्वरूपानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी दोन्ही महाराजांवर तातडीने गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सकल मराठा समाज आणि शिवप्रेमींच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कायदेशीर कारवाईची मागणी
निवेदनात नमूद केल्यानुसार, बागेश्वर बाबा आणि स्वामी स्वरूपानंद यांनी केलेले विधान केवळ असत्य आणि इतिहासाची मोडतोड करणारे आहे. यामुळे सकल मराठा समाज आणि शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर 'भारतीय न्याय संहिता २०२३' च्या कलम १९६ (द्वेष पसरवणे), २९९ (धार्मिक भावना दुखावणे) आणि ३५६ (मानहानी) नुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमांवर बंदी घालण्याचा इशारा
या दोन्ही व्यक्तींना महाराष्ट्रात प्रवचन किंवा कोणताही कार्यक्रम घेण्यास परवानगी देऊ नये, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यांचे युट्युबवरील वादग्रस्त वक्तव्य २४ तासांच्या आत हटवण्यात यावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी पृथ्वीराज पवार, प्रा. चंद्रकांत भराट, सुनील कोटकर, सुधारक शिंदे, किशोर चव्हाण, प्रदीप सोळुंके,राजेंद्र दाते पाटील, पंढरीनाथ गोडसे, डॉ.पी.एम.वाघ, डॉ. शिवानंद भानुसे,प्रा. मनिषा मराठे,कल्पना साखळे पाटील, सचीन हावळे पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड, मुकेश सोनवणे, ॲड. सुवर्णा मोहिते , विष्णू चव्हाण, बाळासाहेब भगनुरे, ज्ञानेश्वर कनके, किशोर ठुबे, सुरेश वाकडे, वैभव बोडखे, राजीव थिटे, रेखा वाहटुळे,रेणुका सोमवंशी, , यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.
Web Summary : The Maratha community demands police action against Dhirendra Shastri and Swami Swarupanand for allegedly disrespectful remarks about Shivaji Maharaj, threatening protests if demands aren't met.
Web Summary : मराठा समुदाय ने धीरेंद्र शास्त्री और स्वामी स्वरूपानंद द्वारा कथित तौर पर शिवाजी महाराज के बारे में अपमानजनक टिप्पणी के लिए पुलिस कार्रवाई की मांग की है, और मांगें पूरी नहीं होने पर विरोध प्रदर्शन की धमकी दी है।