छत्रपती संभाजीनगर : जेवणाची चव वाढवणारी लाल मिरची आता ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी आणणार, अशी चिन्हे दिसत आहेत. अतिपाऊस आणि घटलेले उत्पादन यामुळे लाल मिरचीच्या दरात क्विंटलमागे ३० ते १५० रुपयांपर्यंत वाढ झाली असून, हा ‘तिखट तडका’ आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे.
शहरात लाल मिरचीचे दर किती?प्रकार १३ जानेवारी (प्रति किलो) १३ फेब्रुवारीलवंगी- १८० ते २०० रु. --- १८० ते २५० रु.तेजा- १८० ते २५० ---२४० ते ३००चपाटा- १८० ते २५० -- २५० ते ३५०रसगुल्ला- ३०० ते ४०० -- ४५० ते ५००कश्मिरी--४०० ते ४५० -- ४५० ते ५५०बेडगी--२५० ते ३०० -- ३५० ते ४५०गुंटूर- १८० ते २०० -- २४० ते २८०
भाववाढीची कारणेअतिवृष्टी : ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तेलंगणा आणि आंध्रातील ४५-४६ टक्के जमिनीवरील पिके नष्ट झाली. परिणामी, प्रति हेक्टर उत्पादनात २३-२४ टक्के घट.कमी लागवड : गेल्या दोन वर्षात योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांनी मिरचीऐवजी मक्याला पसंती दिली. यामुळे मिरचीची लागवड २० टक्क्यांनी घटली.
मजुरीचा खर्च : मिरची तोडणीचा खर्च वाढल्याने उत्तर भारतातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले.
आणखी भाववाढीची शक्यतादक्षिण भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्ये (गुंटूर, खम्मम, वारंगल) मालाची आवक कमी आहे. कोल्ड स्टोअरेजमधील सुमारे ८५ टक्के माल संपत आला आहे. व्यापाऱ्यांकडे जुना साठा अत्यंत कमी आहे. उन्हाळ्यात गरम मसाला करण्यासाठी उद्योगांकडून व घरगुती मागणी वाढणार असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.स्वप्नील जैन, व्यापारी
भाववाढीचा व्यापाऱ्यांनाही फटकाखरेदीसाठी येणारे १० पैकी ७ ग्राहक लाल मिरचीचे वाढलेले भाव पाहून तसेच परत जात आहेत. यामुळे व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरही परिणाम होत आहे. कारण, दिवसेंदिवस लाल मिरचीमधील ओलसरपणा कमी होतो व वजन घटत जाते. हे नुकसानदायकच ठरते.
Web Summary : Red chili prices are skyrocketing due to reduced production from excessive rains and decreased cultivation. Prices have risen significantly, impacting household budgets. Further increases are expected due to dwindling stocks and rising demand. Traders also face losses as sales decline amid high prices.
Web Summary : अत्यधिक बारिश और कम उत्पादन के कारण लाल मिर्च की कीमतें आसमान छू रही हैं, जिससे घरेलू बजट पर असर पड़ रहा है। घटते स्टॉक और बढ़ती मांग के कारण कीमतों में और वृद्धि की उम्मीद है। उच्च कीमतों के बीच बिक्री घटने से व्यापारियों को भी नुकसान हो रहा है।