१२ बोटींच्या खरेदीला मान्यता
By Admin | Updated: September 15, 2015 00:35 IST2015-09-15T00:01:31+5:302015-09-15T00:35:17+5:30
औरंगाबाद : मोमबत्ता तलावामध्ये राबविण्यात येणाऱ्या जलक्रीडा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली असून, जवळपास १२ बोटींच्या खरेदीला

१२ बोटींच्या खरेदीला मान्यता
औरंगाबाद : मोमबत्ता तलावामध्ये राबविण्यात येणाऱ्या जलक्रीडा प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली असून, जवळपास १२ बोटींच्या खरेदीला प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली आहे. दोन दिवसांत यासंबंधीच्या ई-टेंडरिंगची प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी पुढाकार घेतल्यामुळे अल्पावधीत सदरील प्रकल्पास तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता मिळू शकली. ५० लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाचा हा प्रकल्प असल्यामुळे नियमानुसार येत्या दोन दिवसांतच ई-टेंडरिंगची प्रक्रिया राबवली जाईल. त्यानंतर जवळपास २५ दिवसांमध्ये दरनिश्चितीनंतर बोटींच्या खरेदीसाठी एक संस्था निवडली जाईल. ज्या तलावात हा प्रकल्प राबविला जाणार आहे, त्या मोमबत्ता तलावाच्या ठिकाणी विविध बांधकामे सुरू केली जातील. मराठवाड्यातील हा पहिलाच आणि तोही गुणवत्तापूर्ण प्रकल्प उभारला जाईल, असा विश्वास उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोळंके यांनी व्यक्त केला.
येत्या २३ सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदेची नियमित सर्वसाधारण सभा होईल. तोपर्यंत बोट खरेदीसाठी संस्था निश्चित होणार नाही.
५० लाख रुपयांहून अधिक रकमेचा हा प्रस्ताव असल्यामुळे सर्वसाधारण सभेलाच खर्चाला मान्यता देण्याचे अधिकार आहेत. त्यामुळे यासाठी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्याची विनंती जि.प. अध्यक्ष श्रीराम महाजन यांना प्रशासनाच्या वतीने केली जाईल. मोमबत्ता तलावात जलक्रीडेसाठी दोन स्कायजेट बोटी, १२ प्रवासी क्षमतेच्या दोन बोटी, ६ पॅडल बोटी, अशा जवळपास १२ बोटी खरेदी करण्याचा जिल्हा परिषदेचा विचार आहे.