शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

६०० रुपयांची लाच स्वीकारताना रेणापूरचा तलाठी जाळ्यात

By admin | Updated: July 23, 2014 00:31 IST

लातूर : बोअरची नोंद सातबाऱ्यावर घेण्याच्या कामी रेणापूरच्या एका तलाठ्यास ६०० रूपयांची लाच स्विकारताना मंगळवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले

लातूर : शेतात घेण्यात आलेल्या बोअरची नोंद सातबाऱ्यावर घेण्याच्या कामी रेणापूरच्या एका तलाठ्यास ६०० रूपयांची लाच स्विकारताना मंगळवारी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रूपचंदनगर येथील त्याच्या खाजगी कार्यालयात रंगेहात पकडले. याबाबत रेणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.रेणापूर तालुक्यातील शेरा शिवारातील शेतात पाडण्यात आलेल्या दोन बोअरची नोंद सातबाऱ्यावर घ्यायची होती. संबंधित शेतकऱ्याने तलाठी राजेंद्र पांडुरंग संपत्ते यास नोंद करण्याची मागणी केली. मात्र तलाठी संपत्ते याने शेतकऱ्यास ६०० रूपयांची लाच मागितली. दरम्यान, ठरल्यानुसार मंगळवारी दुपारी शेतकऱ्यास रूपचंद नगर येथील स्वत:च्या खाजगी कार्यालयात तलाठ्याने बोलविले. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छापा मारला असता, तलाठी राजेंद्र पांडुरंग संपत्ते पंचासमक्ष लाच स्विकारताना जाळ्यात सापडला. याबाबत रेणापूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अ‍ॅन्टीकरप्शनचे पोलिस अधीक्षक एन. व्ही. देशमुख, पोलिस उपाधीक्षक एन. जी. अंकुशकर, सुनील नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके, विलास मलवाडे, सदानंद योगी, राजेंद्र वाघमारे, विष्णू गुंडरे, दत्ता विभुते, धर्मपाल गुट्टे, शैलेश सुडे, धारेकर यांनी परिश्रम घेतले. प्रकरणाचा पुढील तपास पोनि. अभिमन्यू साळुंके करीत आहेत. (प्रतिनिधी)