शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

पुरवठ्याच्या यादीचे होणार चावडी वाचन

By admin | Updated: September 15, 2014 00:27 IST

चेतन धनुरे, उदगीर उदगीरच्या पुरवठा विभागातील अनागोंदी ‘लोकमत’ने उजेडात आणताच महसूल प्रशासनाला जाग आली आहे़

चेतन धनुरे, उदगीरउदगीरच्या पुरवठा विभागातील अनागोंदी ‘लोकमत’ने उजेडात आणताच महसूल प्रशासनाला जाग आली आहे़ शनिवारी तहसीलदारांनी पुरवठ्याच्या यादीचे चावडीवाचन करण्याच्या सूचना तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ त्यात अतिरिक्त निघणारी नावे वगळण्यात येतील़, असे तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले़‘लोकमत’ने मागील तीन दिवसांपासून पुरवठा विभागाच्या यंत्रणेतील दोषांवर प्रकाश टाकला होता़ प्रत्यक्ष रेशन कार्डावर लाभार्थ्यांची कमी नावे असतानाही वितरणाच्या यादीत मात्र संख्येत वाढ करुन अतिरिक्त धान्य मागविले जात होते़ शिवाय, धान्य वितरणाच्या गोदामातही मापात पाप करुन लूट केली जात होती़ या विषयावर सविस्तर प्रकाश टाकल्यानंतर मालिकेची दखल घेत महसूल प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे़ उपविभागीय अधिकारी विकास खरात यांनी तहसीलदारांना चौकशीच्या सूचना केल्या होत्या़ त्याअनुषंगाने शनिवारी तहसीलदारांनी लेखी आदेश काढून पुरवठ्याच्या यादीचे गावात जाऊन चावडी वाचन करण्याचे निर्देश मंडळ अधिकारी, तलाठ्यांना दिले आहेत़ शिवाय, गोदामात वजनकाट्यात तूट पाडली जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आला आहे़ गोदामात इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बसविण्याची प्रक्रिया तातडीने व्हावी, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत़ वरिष्ठ कार्यालयाकडून सूचना मिळताच इलेक्ट्रॉनिक वजनकाटा बसविण्यात येणार असल्याचे तहसीलदार शिंदे यांनी सांगितले़ तसेच खाजगी व्यक्ती आढळून आल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्याचे संकेत शिंदे यांनी दिले़चार दिवसांची मुदत़़़पुरवठ्याच्या यादीतून अतिरिक्त नावे कमी करण्याच्या अनुषंगाने तलाठी व मंडळ अधिकारी चावडी वाचन करणार आहेत़ त्यासाठी त्यांना चार दिवसांची मुदत देण्यात आली आहे़ चार दिवसांत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत़ या प्रक्रियेत यंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासोबतच जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरही कारवाई होणार आहे़