रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांची आजपासून प्रवचनमाला

By Admin | Updated: June 3, 2014 01:08 IST2014-06-03T00:58:38+5:302014-06-03T01:08:54+5:30

औरंगाबाद : प्रवचनकार राष्टÑसंत जैनाचार्य श्री विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांच्या परिवर्तन प्रवचनमालेस दि.२ जूनपासून औरंगाबादेत सुरुवात होत आहे.

Ratnasundasurishwarji M.Sa. From today's discourse | रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांची आजपासून प्रवचनमाला

रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांची आजपासून प्रवचनमाला

औरंगाबाद : सत्य व अहिंसेचे पुजारी भगवान महावीर यांचे तत्त्व- वचन हा संदेश प्रभावीपणे जनमानसात पोहोचविणारे, २८५ पुस्तकांचे लेख, प्रखर वक्ता व प्रवचनकार राष्टÑसंत जैनाचार्य श्री विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांच्या परिवर्तन प्रवचनमालेस दि.२ जूनपासून औरंगाबादेत सुरुवात होत आहे. श्री श्वेतांबर वर्धमान जैन सेवा संघ, सिडको व सकल जैन समाज यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नसुंदरसुरीश्वरजी म.सा. यांच्या नेतृत्वाखालील १२ महाराज साहेब व १८ साध्वीजींच्या सान्निध्यात यंदाचा चातुर्मासही २९ जूनपासून सिडको एन-३ मधील केशरबाग येथे संपन्न होणार आहे. आज दुपारी एका पत्रपरिषदेत ही माहिती देण्यात आली. प्रकाश बाफना, रतिलाल मुगदिया, जी.एम. बोथरा, विलास साहुजी, डॉ.प्रकाश झांबड, महावीर पाटणी, प्रशांत शहा, पीयूष कासलीवाल आदींची यावेळी उपस्थिती होती. रत्नसुंदरसुरीश्वरजींनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. ३ जूनपासून सुरू होणार्‍या प्रवचनमालेची वेळ सकाळी ८.४५ ते १० अशी राहणार आहे. ३ जून रोजी जालना रोडवरील बिग बाजार हॉलमध्ये ‘आओ करें नई शुरुआत’ या विषयावर, ४ जून रोजी याचठिकाणी ‘कैसे आयेंगे भगवान?’ या विषयांवर श्री रत्नसुंदरसुरीश्वरजींचे प्रवचन होईल. ५ व ६ जून रोजी बालाजी मंगल कार्यालयात ‘अब तो रुक जाओ’ व ‘सच्ची अमिरी’ या विषयावर, ७, ८ व ९ जून रोजी चंद्रसागर धर्मशाळा, शहागंज येथे ‘जी लो जी भरके’, ‘रामायण के अनोखे रंग’ व ‘अब आंगन सजा लो’ या विषयांवर, १० ते १२ जूनपर्यंत जोहरीवाडा रंगारगल्ली येथे ‘समाधान या सावधान’, ‘सुन लो मेरी बात’, व ‘एक नजर भीतर भी’ या विषयांवर महाराजांचे प्रवचन होईल. १३ जून ते १८ जूनपर्यंत महावीर भवनात ही प्रवचने होतील. विषय असे:‘ ये रिश्ता निभायेंगे’, ‘ साथ चाहिए पर कहां तक’,‘ मन का महाभारत’, १६ जून ते १८ जूनपर्यंत अग्रसेन भवनात प्रवचने होतील. विषय असे: ‘हमारी पहचान क्या?’, ‘हमारा प्रयास क्या?’, ‘हमारा आदर्श क्या?’. १९ व २० जून रोजी तिवारी मंगल कार्यालयात ही प्रवचने होतील. विषय असे: ‘बोल तू मीठे बोल’, ‘कब तक करोगे इंतजार’. २१ जून ते २४ जूनपर्यंत वर्धमान रेसिडेन्सी, खिंवसरा पार्क येथे प्रवचने होतील. विषय असे: ‘ कुछ कहना है’, ‘क्या है आपके सपने?’, ‘दूरसे ही प्रणाम’, ‘थकना मत’. २५ जून रोजी अग्रसेन भवन, सिडको येथे ‘कुछ कहती है हाथोंकी लकीर’ या विषयावर रत्नसुरीश्वरजींचे प्रवचन होईल. २१ जून रोजी दोन दीक्षार्थींना मोठी दीक्षा रेसिडेन्सी, खिंवसरा पार्क येथे देण्यात येणार आहे. २९ जून रोजी सकाळी ८ वा. आ. सुभाष झांबड यांच्या निवासस्थानापासून मिरवणूक निघेल. चातुर्मासासाठी त्यांचे केशरबागेत आगमन होईल. २९ जूनपासून महाराज साहेबांच्या सान्निध्यात चातुर्मास सुरू होईल.

Web Title: Ratnasundasurishwarji M.Sa. From today's discourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.