पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतली रेशन दुकानदारांची बैठक
By Admin | Updated: July 27, 2014 01:10 IST2014-07-27T00:26:18+5:302014-07-27T01:10:58+5:30
बीड : स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील घोटाळे दूर करण्याच्या दृष्टीकोणातून पुरवठा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हयातील रेशन दुकानदारांची बैठक घेतली.

पुरवठा अधिकाऱ्यांनी घेतली रेशन दुकानदारांची बैठक
बीड : स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेतील घोटाळे दूर करण्याच्या दृष्टीकोणातून पुरवठा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी जिल्हयातील रेशन दुकानदारांची बैठक घेतली. बैठकीत अधिकाऱ्यांनी रेशनदुकानांना नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहन करत चांगलेच सुनावले़
जिल्ह्यातील रेशन दुकानदारांच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आलल्या आहेत. या तक्रारी यापुढील काळात येऊ नयेत. यासाठी पुरवठा विभागाकडून उपाय योजन करण्याच्या पुरवठा अधिकारी एस. व्ही. सुर्यवंशी यांनी सुचना केल्या़ स्वस्त धान्य दुकान उघडे ठेवावे, रॉकेल विकणाऱ्या हॉकर्संनी परवानगी दिलेल्या जागेवरच रॉकेल विक्री करावे, रॉकेलच्या गाड्यावर परवाना क्रमांक टाकणे तसेच यापेक्षाही महत्वाचे म्हणजे अन्न धान्य चलन १ ते ५ तारखेपर्यंत भरून महिन्याच्या १५ तारखे पर्यंत संबंधित गोदामातून धान्य उचलावे आदी सूचना करण्यात आल्या. (प्रतिनिधी)
अचानक देणार भेट
बैठकीत दिलेल्या सूचना रेशन दुकानदार अमलबजावणी करतात की नाही याची तपासणी पुरवठा विभागाकडून करण्यात येईल.
पथकांकडून अचानक रेशन दुकानाला भेट देऊन पहाणी केली जाईल. असे यावेळी पुरवठा अधिकारी एस. व्ही. सूर्यवंशी यांनी सांगितले.