लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 21:06 IST2019-03-01T21:06:19+5:302019-03-01T21:06:31+5:30

लग्नाचे आमिष दाखवून ३८ वर्षीय महिलेवर विविध ठिकाणी बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार घडला. लग्नाला नकार देत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोहंमद इकराम खान अब्दुल समदखान याच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Rape of woman by showing lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून ३८ वर्षीय महिलेवर विविध ठिकाणी बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार घडला. लग्नाला नकार देत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मोहंमद इकराम खान अब्दुल समदखान याच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुरुवारी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


महिलेचा घटस्फोटझालेला असून, तिचा मुलगा बडोदा येथे शिक्षण घेत आहे. ती टाइम्स कॉलनीत एकटीच राहते. कापड विक्रीचे दुकान चालविते. कपडे आणण्यासाठी खाजगी ट्रॅव्हल्सने सुरतला येणे-जाणे असते. मोहंमद इकराम खान अब्दुल समदखान याच्यासोबत ओळख झाली. मुलाकडे जाण्यासाठी तिकीट काढण्यासाठी गेलेल्या महिलेला स्वत:च्या कारमधून सोडण्याचा बहाणा करून बारडोली येथे एका हॉटेलात थांबले. खोलीत बलात्कार केला, त्याला जाब विचारला असता, त्याने विवाह करण्याचे आमिष दाखवून पुन्हा कारमध्ये अत्याचार केला.

विवाहासाठी नकार देत मुलाला व महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. जिन्सी ठाण्यात अनेकदा तक्रारी दिल्या; परंतु त्यावर कारवाई झाली नसल्याने न्यायालयात दाद मागितली. अखेर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गिते करीत आहेत.

Web Title: Rape of woman by showing lover of marriage