फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 15:33 IST2021-03-18T15:31:08+5:302021-03-18T15:33:28+5:30
पीडिता ज्या ठिकाणी नोकरीला जाते, त्या ठिकाणी जावून पीडितेला शिवीगाळ करून मारहाण केली

फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार
औरंगाबाद : मोबाइलमध्ये काढलेल्या फोटोच्या माध्यमातून बदनामी करण्याची धमकी देत विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यासह त्याला मदत करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनंदन अनंत धनले (रा. छावणी परिसर) हा पीडितेच्या घराजवळ राहतो. अभिनंदन धनले याने आपल्या मोबाइलमध्ये पीडितेचे फोटो काढले होते, तसेच ते फोटो तुझ्या नवऱ्याला दाखवून तुझी बदनामी करेन, अशी धमकी देत त्याने मार्च २०१९ ते १६ मार्च २०२१ या काळात विविध ठिकाणी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पीडिता ज्या ठिकाणी नोकरीला जाते, त्या ठिकाणी जावून पीडितेला शिवीगाळ करून मारहाण केली होती. पीडितेच्या तक्रारीवरून धनले व त्याला मदत करणाऱ्या दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक हिवराळे करीत आहेत.