शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

MIMमधून हकालपट्टी केलेला नगरसेवक सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2019 11:39 AM

मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन पक्षातून अलीकडेच हकालपट्टी करण्यात आलेला आणि सातत्याने वादग्रस्त ठरलेला नगरसेवक सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी (15 जानेवारी) एका 30 वर्षीय महिलेनं मतीनविरोधात बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे. 

ठळक मुद्देएमआयएम नगरसेवकाविरोधात बलात्काराचा आरोपनोकरीचे आमीष दाखवून बलात्कार केल्याचा महिलेचा आरोपतक्रारीनंतर नगरसेवक सय्यद मतीन बेपत्ता

औरंगाबाद : मजलीस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन पक्षातून (एमआयएम) अलीकडेच हकालपट्टी करण्यात आलेला आणि सातत्याने वादग्रस्त ठरलेला नगरसेवक सय्यद मतीनवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिटी चौक पोलीस ठाण्यात मंगळवारी (15 जानेवारी) एका 30 वर्षीय महिलेनं मतीनविरोधात बलात्कार केल्याची तक्रार नोंदवली आहे. 

आधार कार्ड बनवून देतो, नोकरी मिळवू देतो, असे सांगत मतीनने अत्याचार केल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. पीडित महिला आपल्या पतीपासून विभक्त झाली आहे. महिलेला दोन मुले असून ती तिच्या आईसोबत राहते. आधार कार्ड बनवण्यासाठी वर्षभरापूर्वी प्रगती कॉलनी, आसेफिया कॉलनी वॉर्डातून निवडून आलेला नगरसेवक सय्यद मतीनच्या कार्यालयात गेली होती. मतीनने तिला आधारकार्ड बनवून देतो, नोकरीही मिळूनही देतो, तसेच लग्न करतो, अशी थाप मारून तिच्याशी जवळीक निर्माण केली. रशीदपुरा आणि टाऊन हॉल येथे घेतलेल्या घरात त्याने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला, असा आरोप पीडितेनं केला आहे. 

यानंतर, घटनेची वाच्यता कोठेही केल्यास जिवे मारेन, अशी धमकीदेखील दिल्याचे महिलेने पोलिसांनी सांगितले. मतीनने लग्नास नकार दिल्यानंतर महिलेने याबाबत पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिका-यांची भेट घेऊन मतीनविरुद्ध तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी मतीनविरुद्ध रीतसर कारवाई करण्याचे आदेश सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादासाहेब शिंगारे यांना दिले. मंगळवारी (15 जानेवारी) रात्री अखेर महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सय्यद मतीन सय्यद रशीदविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरू असताना नगरसेवक मतीन बेपत्ता झाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.