शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

जालन्यात रावसाहेब दानवे, कैलास गोरंट्यालांच्या रणनीतीने भाजप नंबर वन; शिंदेसेना बॅकफूटवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 18:14 IST

निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, काँग्रेसचे केवळ नऊ उमेदवार विजयी, उद्धवसेनेनेसह दोन्ही राष्ट्रवादीचा सुपडासाफ

 

- विजय मुंडेजालना : महानगरपालिका निर्मितीनंतर प्रथमच झालेल्या जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष ४१ जागांवर विजय मिळवित 'किंग' ठरला आहे. भाजपचे नेते माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल हे या निवडणुकीतील धुरंधर ठरले असून, मित्रपक्ष शिंदेसेनेला १२ जागांवर समाधान मानावे लागले आहे. महाविकास आघाडीतील केवळ काँग्रेसला नऊ जागांवर विजय मिळविता आला आहे.

जालना नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर आपल्याच पक्षाचा झेंडा रोवण्यासाठी नेतेमंडळींनी साखर पेरणी सुरू केली होती. निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर महायुती, मविआसाठी बैठकांचे फड रंगले. परंतु, महायुतीतील भाजप, शिंदेसेनेने स्वबळावर उमेदवार दिले होते. तर राष्ट्रवादीने (अजित पवार) मनसेसोबत युती करून उमेदवार उभा केले होते. महाविकास आघाडीची मोट या निवडणुकीत कायम राहिली होती. प्रचाराच्या रणधुमाळीत एकमेकांवर टीका न करण्याचा ‘तह’ पाळत प्रचार यंत्रणा राबविण्यात आली. महानगरपालिकेच्या पहिल्याच निवडणुकीत ६१.१६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर शुक्रवारी मतमोजणी सुरू झाली. प्रभागनिहाय येणाऱ्या निकालात भाजपने बहुमताकडे वाटचाल सुरू केली होती. भाजपला बहुमत मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट होताच समर्थकांनी एकच जल्लोष सुरू केला होता. अखेरचा निकाल हाती आल्यानंतर भाजपने ४१ जागांसह बहुमत मिळविले. शिंदेसेनेने १२, काँग्रेसने ९ तर एमआयएमने दोन जागांवर विजय मिळविला. तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या उमेदवारांसह समर्थकांनी संपूर्ण शहरात मोठा जल्लोष केला. या निवडणुकीच्या निकालानंतर माजी मंत्री रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे व समर्थकांनी एकत्रित येत जल्लोष केला. भाजपने केंद्र आणि राज्याच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांना मतदारांनी काैल दिल्याचे सांगण्यात आले. यापुढील काळात शहराचा चेहरा-मोहरा बदलणार असल्याची ग्वाही नेतेमंडळींनी दिली. त्यानंतर उमेदवारांनी आपापल्या प्रभागात समर्थकांसह मोठा जल्लोष केला. दरम्यान, ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुषकुमार नोपाणी व इतर प्रशासकीय यंत्रणेने मोठे प्रयत्न केले. त्यामुळे कायदा-सुव्यवस्था आबाधित राहिली.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP wins Jalna election due to Danve, Gortyals strategy.

Web Summary : BJP secured a majority in Jalna, winning 41 seats, due to Danve and Gortyals' strategy. Shinde's Sena lagged with 12. Congress won 9. Development promised.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Jalna Municipal Corporation Electionजालना महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६raosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपा