शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘योगेश्वरी’च्या दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा

By admin | Updated: December 3, 2014 01:17 IST

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर

अंबाजोगाई : महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व अंबाजोगाईचे ग्रामदैवत असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सव २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत साजरा होत आहे. या दरम्यान महोत्सवाच्या निमित्ताने देवीच्या दर्शनासाठी पहाटे पाच वाजल्यापासूनच महिला व भाविकांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. मात्र, रस्त्यावरच वाहने उभी राहत असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी या परिसरात निर्माण झाल्याने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातून भाविकांचा दर्शनासाठी ओघ सुरू झाला आहे. पहाटे पाच वाजल्यापासून महिला व भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. वाढती गर्दी व सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भाविकांच्या सेवेसाठी देवल कमिटीच्या वतीने दररोज सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे व शहरात येणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे वाहतुकीची कोंडी वाढली आहे. रस्त्यावरच वाहने लावण्यात येत असल्याने रहदारीत मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत आहे. याचा त्रास भाविकांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. अगोदरच मंडीबाजारातील रस्ते अरूंद असल्याने होणारी ही कोंडी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस उपाययोजना आखाव्यात अशी मागणी माजी उपनगराध्य रवींद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धायगुडे, राजेश गुप्ता, अतुल जाधव, विनोद तापडे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ म्हणाले, वाहतुकीची कोंडी रोखण्यासाठी मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनांवर दंडात्मक कारवाई करू. (वार्ताहर)