शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

रानडुकराने केली ज्वारी भुईसपाटा

By admin | Updated: December 19, 2015 23:53 IST

, बीड दुष्काळाच्या दाहकतेमध्येही तळहातावरील फोडाप्रमाणे जोपासलेल्या ज्वारीचा एका रात्रीत रानडुकरांनी काटा काढला. ऐन डौलात उभी असलेली आठ फुटी ज्वारी

 

, बीड दुष्काळाच्या दाहकतेमध्येही तळहातावरील फोडाप्रमाणे जोपासलेल्या ज्वारीचा एका रात्रीत रानडुकरांनी काटा काढला. ऐन डौलात उभी असलेली आठ फुटी ज्वारी आडवी झाल्याची पाहून उभ्या वावरातच शेतकऱ्यांनी अक्षरश: टाहो फोडला. वनविभागाच्या नाकर्तेपणाला कंटाळून संबंधित शेतकऱ्याने वनधिकारी काळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. निसर्गाने तर गेल्या तीन वर्षापासून अवकृपा दाखवली आहेच. असे असतसनाही योग्य नियोजन करून बीड तालुक्यातील नागझरी येथील चंद्रसेन कळसुले यांनी आडीच एकरात ज्वारीचा पेरा केला होता. जमिन बागायत असल्याने ज्वारी बहरात होती. आठ फुटी ज्वारी आता पोटऱ्यात येऊन निसवली होती. अशातच रानडुकरांच्या उपद्रवाने आठ फुटी उभी ज्वारी एका रात्रीत आडवी झाली. शेतजमिनी लगतच वनक्षेत्र असल्याने सातत्याने हरिण, रानडुकरांचा त्रास हा नित्याच झाला होता. यंदा दुष्काळी परिस्थितीमध्येही ज्वारी पिक चांगले होते. त्यामुळे कळसुले यांनी रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी वनविभागाकडे अनेक वेळा केली होती. मात्र, विभागाकडून दुर्लक्ष केल्यानेच पिकाचे नुकसान झाले असल्याने हताश झालेल्या कळसुले यांनी लिंबागणेश ठाण्यात वनअधिकारी काळे यांच्या विरोधात तक्रार नोंद केली आहे. शेतकऱ्याने नुकसानीसंदर्भात रीतसर तक्रार नोंद केल्यास नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे वनविभागाचे अधिकारी एस. पी. काळे म्हणाले. दुष्काळात तेरावा दुष्काळी परिस्थितीने खरीपाबरोबर रब्बी हंगामही धोक्यात आहे. केवळ ज्वारी हे पिक थोड्याबहुत प्रमाणात आहे. यालाही रानडुकरांचा धोका होत आहे. निसर्गाची अवकृपा त्यात प्रशासनाची उदासीनता यामुळे दुष्काळात तेरावा अशी परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी दुहेरी कात्रीत आहेत.