रमो रमा रे होळी,रो त्योहार होळी रमलो र ...
By Admin | Updated: March 23, 2016 01:02 IST2016-03-23T00:37:30+5:302016-03-23T01:02:32+5:30
मंठा : बंजारा समाज आणि होळीचा सण यांचे अतूट नाते आहे. क ालानुरु प सण साजरा क रण्याची पध्दती बदलत असली तरी बंजारा समाजाने होळी सणाची आपली

रमो रमा रे होळी,रो त्योहार होळी रमलो र ...
मंठा : बंजारा समाज आणि होळीचा सण यांचे अतूट नाते आहे. क ालानुरु प सण साजरा क रण्याची पध्दती बदलत असली तरी बंजारा समाजाने होळी सणाची आपली पारंपरिक पध्दती अजूनही जोपासली आहे. विशेष म्हणजे मंठा तालुक्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी होळी व धुळवडीच्या सणासाठी बंजारा तांड्यावर धूम सुरु आहे.
या तालुक्यात बंजारा तांडे व समाज मोठ्या संख्येने आहेत. हा समाज होळी सणाला अत्यंत महत्व देतो. होळीच्या सणासाठी एक आठवड्यापासून तयारी सुरु होते. म्हणून तो आपल्या लेंगीतून म्हणतो, ‘रमो रमा रे होळी,रो त्योहार होळी रमलो र ...’ अशा दररोज लेहंगी गीते गायली जातात. प्रत्येक तांड्यावर जगदंबा देवीचे मंदिर असते. या मंदिरासमोर पारंपरिक लेहंगी गीते गायली जातात. लाठ्या- काठ्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. त्यानंतर पुन्हा तांड्याचा प्रमुख असणाऱ्या नायकाच्या घरासमोरही लेहंगी गीते व लाठ्या- काठ्यांचे प्रात्यक्षिक दाखविले जाते. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीला बंजारा तांड्यातील स्त्री-पुरूष, आबालवृध्द, लहान-मोठे, गरीब- श्रीमंत असे एक त्र होऊ न मोठ्या उत्साहात होळी सण साजरा क रतात. एक मेक ांच्या अंगावर मनसोक्त रंग उडवून बंजारा बोली भाषेतील खास धुडवडीची गीते गायली जातात. मद्य हे पेयपदार्थ व जेवणाला मटणाचाच प्रामुख्याने बेत ठरविला जातो. सामूहिक व पारंपरिक पध्दतीने आजही ही होळी साजरी के ली जाते. अलिकडच्या काळात शहरात वास्तव्यास असलेल्या बंजारा बांधवांमध्ये सामूहिक व पारंपरिक पध्दतीने होळी क रण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी तांड्यावर राहणाऱ्या समाज बांधवांनी मात्र परंपरा अजूनही जोपासली आहे. ही होळी म्हणजे एक सांस्कृतिक पर्वणीच आहे. होळी निमित्ताने गायल्या जाणाऱ्या लेहंगी गीताची सुरूवात... पहिलो समरण करलो गणपती रे, पहिलो समरण करलो सेवालाल महाराज रे ...या नमन गीताने केली जाते. सुख-दु:ख सेमछ, सुखेन क ोई साथ दिया, दुखेन क ोई साथ देईनी, अशी आशयपूर्ण गीतांची उधळणही होते. राम राम नाम भजेनी कोई, पाप व्हेगे पुण्य करेनी कोई, पापेरी वासना भुलाई कोणी, राम राम नाम भजेनी कोई ... अशा भक्ती गीतातून संदेश दिला जातो. मात्र होळीच्या निमित्ताने आपल्या नवऱ्याला गीतांच्या माध्यमातून आडव्या हाताने घेण्याची खास पध्दतही बंजारा समाजातील महिलांमध्ये आहे. होळी सणासाठी बंजारा तांडे सज्ज झाले आहेत. (शहर प्रतिनिधी)