शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

‘पीईएस’ सोसायटीच्या अध्यक्षपदावरून रामदास आठवले विरुद्ध आनंदराज आंबेडकर !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 13:21 IST

‘पीईएस’चा अध्यक्ष मीच, यापुढे माझ्या स्वाक्षरीने आर्थिक व्यवहार करा असे आठवले बोलल्यानंतर त्याला आनंदराज आंबेडकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे

छत्रपती संभाजीनगर : ‘पीईएस’चा कायदेशीर अध्यक्ष मीच आहे. यापुढे इथल्या प्राचार्यांनी माझे ऐकले पाहिजे, माझ्या स्वाक्षरीने आर्थिक व्यवहार केले पाहिजेत, अन्यथा त्यांना बदलावे लागेल, असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिला.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आठवले शहरात आले होते. आठवले म्हणाले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी पीईएसची स्थापना केली. ही संस्था केवळ दलितांचीच राहू नये यासाठी विश्वस्तांमध्ये सात दलित आणि चार दलितेतर विश्वस्त असे एकूण ११ जण असावेत, अशी संस्थेच्या घटनेतच तरतूद केली आहे. कोणी म्हणते एस. पी. गायकवाड अध्यक्ष आहेत, तर कोणी आनंदराज आंबेडकर आहेत. मात्र, अध्यक्ष मीच आहे. न्यायालयाने अध्यक्षपदाचा माझा कायदेशीर मार्ग मोकळा केला आहे. त्यामुळे पीईएसमध्ये काम करणाऱ्या संस्थांच्या सर्व प्राचार्यांनी माझे ऐकले पाहिजे.

आठवले यांनीच पीईएसचे वाटोळे केले : आनंदराज आंबेडकररामदास आठवले यांनीच आंबेडकरी राजकारण आणि पीईएस सोसायटीचे वाटोळे केल्याचा आरोप रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांनी केला. आठवले हे अडाणी असून त्यांना यातील काहीही कळत नसल्याची टीकाही यावेळी आंबेडकर यांनी केली. आनंदराज म्हणाले, आठवले यांना यातील काहीही कळत नाही. ते शिकले असते तर बरे झाले असते. कोणत्याही कोर्टाने आठवले यांना अध्यक्ष असल्याचे म्हटलेले नाही. तसा कोणताही पुरावा त्यांच्याकडे नाही. त्यांनी केवळ पीईएसचे नाही तर आंबेडकरी राजकारणाचे देखील वाटोळे केल्याची टीका आंबेडकर यांनी केली. त्यांना अध्यक्ष होण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना लवकरच संस्थेतून कायदेशीररीत्या बाहेर काढू. त्यांनी वायफळ बडबड करू नये, असेही आनंदराज म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरNagsen vanनागसेन वनEducation Sectorशिक्षण क्षेत्र