शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
5
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
6
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
7
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
8
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
9
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
10
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
11
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
12
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
13
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
14
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
15
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
16
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
17
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
18
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
19
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
20
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
Daily Top 2Weekly Top 5

महानगरपालिकेचा कारभार रामभरोसे

By admin | Updated: July 14, 2014 00:59 IST

परभणी : येथील महानगरपालिका अस्तित्वात येऊन तीन वर्षे होऊन गेली आहेत़ परंतु, मनपाचा कारभार ढिसाळ झाला आहे़ पंधरा दिवसांपासून मनपा आयुक्त रजेवर गेले आहेत़

परभणी : येथील महानगरपालिका अस्तित्वात येऊन तीन वर्षे होऊन गेली आहेत़ परंतु, मनपाचा कारभार ढिसाळ झाला आहे़ पंधरा दिवसांपासून मनपा आयुक्त रजेवर गेले आहेत़ या पदाचा कारभार कोणालाही दिला नाही़ त्यामुळे मनपाच्या कारभारावर कोणाचेच नियंत्रण राहिले नाही, असा आरोप मनपा विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी केला.
शहराची लोकसंख्या ३ लाखापर्यंत आहे़ परंतु, महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यास अपयश आले आहे़ सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असताना पथदिवे बंद आहेत़ पाणीपुरवठा व्यवस्था ढासाळली आहे़ त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़ तसेच मनपातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यामुळे त्या जागी नवीन अधिकारी आलेच नाहीत़ रिक्त जागांमुळे कामांचा खोळंबा झाला आहे़ शहरातील घरकुल योजनेसाठी निधी असूनही कामे पूर्ण झाली नाहीत, अशा अनेक समस्या असतानाही सत्ताधारी पदाधिकारी व प्रशासनाचे याकडे लक्ष नाही, अशी खंत मनपा विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी व्यक्त केली़
तसेच पाणीपुरवठा, नगररचना कर अधीक्षक, यांत्रिकी या विभागात शहराच्या गरजा पुरविण्याकरिता कोणताही अधिकारी उपलब्ध नाहीत़ यामुळे परभणी शहर महानगरपालिकेची अवस्था रामभरोसे झालेली आहे़, असे मनपाचे विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
अर्ध्या शहरातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे़
घंटागाड्या दुरुस्ती अभावी शहराची स्वच्छता होत नसल्याने जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे़ त्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे़
पंधरा दिवसाआड पाणीपुरवठा