राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचा राजीनामा
By Admin | Updated: May 24, 2014 01:43 IST2014-05-24T01:22:46+5:302014-05-24T01:43:05+5:30
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार डॉ़ पद्मसिंह पाटील यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार
राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांचा राजीनामा
उस्मानाबाद : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार डॉ़ पद्मसिंह पाटील यांच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे दिला आहे़ उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ़ पद्मसिंह पाटील यांचा २ लाख, ३४ हजार मतांनी पराभव झाला़ या पराभवाची जबाबदारी स्वीकारून बिराजदार यांनी १७ मे रोजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे राजीनामा दिला होता़ प्रदेशाध्यक्ष जाधव यांची बिराजदार यांनी शुक्रवारी भेट घेऊन प्रत्यक्ष राजीनामा दिला़ उमरगा-लोहारा तालुक्यात पक्षबांधणी करण्यात बिराजदार यांनी गत दहा वर्षात मोठे काम केले आहे़ भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना, भाऊसाहेब बिराजदार नागरी सहकारी बँक, छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था या विविध क्षेत्रात त्यांनी काम केले असून, गत निवडणुकीत राष्ट्रवादीला पालिकेचे नगराध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली होती़डॉ़ पाटील यांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत यापुढे कार्यकर्ता म्हणून काम आपण पक्षाचे काम करणार असल्याचे त्यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे़ दरम्यान, प्रा़बिराजदार यांनी राजीनामा दिल्यानंतर आता जिल्हाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे़ (प्रतिनिधी)