शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
4
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
5
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
6
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
7
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
8
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
9
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
10
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
11
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
12
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
13
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
14
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
15
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
16
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
17
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
18
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
19
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्र दर्डा यांचा उमेदवारी अर्ज दाखल

By admin | Updated: September 27, 2014 01:10 IST

औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

औरंगाबाद : मिरवणूक, शक्तिप्रदर्शनाला फाटा देत, मोजके पदाधिकारी, समाजातील व विविध क्षेत्रातील मान्यवर प्रतिनिधींना सोबत घेऊन काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी शुक्रवारी अत्यंत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. याप्रसंगी त्यांच्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष अ‍ॅड़ सय्यद अक्रम, प्राचार्य राजाराम राठोड, उद्योजक मानसिंग पवार व युवा राष्ट्रीय कबड्डीपटू सविता दाभाडे हे मान्यवर होते. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील निवडणूक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती कारले यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज स्वीकारला़ उमेदवारी दाखल केल्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ ते म्हणाले की, उमेदवारी अर्ज सादर करताना सर्व समाज व क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे मान्यवर पाठीराखे म्हणून माझ्यासोबत आहेत, याचा मला आनंद वाटतो. गेल्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात गुंठेवारी भागाच्या विकासापासून ते डीएमआयसीसारख्या औद्योगिक प्रकल्पापर्यंत अनेक विकासकामे मी केली. मतदारांनी संधी दिल्याने हे मी करू शकलो. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी लोक ठामपणे उभे असतात, याचा मला विश्वास आहे. राजेंद्र दर्डा म्हणाले की, आगामी काळात औरंगाबादच्या विकासाची संकल्पना मांडणारा जाहीरनामा मी येत्या चार दिवसांमध्ये सर्वांसमोर ठेवणार आहे़ विशेष म्हणजे शहरातील ५० हजार नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांचे मत जाणून घेऊन हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. जे लोकांना हवे, तेच येणाऱ्या काळात करण्याचा मी प्रयत्न करणार आहे़ माझ्या शहरातील, जिल्ह्यातील नागरिकांचे जीवन सुरक्षित व सुसह्य व्हावे, यासाठी मी कटिबद्ध आहे.ही निवडणूक दुरंगी-तिरंगीच नव्हे तर बहुरंगी होणार असल्याने यावेळेस मोठी स्पर्धा आहे, असे मला वाटत नाही. उलट पक्षांसोबतच उमेदवाराचे कामही बघितले जाणार आहे़ आजचा मतदार जागरूक असून, ज्या व्यक्तीने काम केले, त्यालाच तो निवडून देणार असल्याचा विश्वास यावेळी राजेंद्र दर्डा यांनी व्यक्त केला़