Raj Thackeray: 'तेरी हैसियत नही की'; अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंवर शायरीतून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 07:47 PM2022-05-12T19:47:00+5:302022-05-12T19:49:27+5:30

मी येथे कुणालाही उत्तर द्यायला आलो नाही, त्यांची लायकीच नाही, ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर मी काय बोलू, असे म्हणत अकबरुद्दीन यांनी शायरीतून नाव न घेता मनसेप्रमुख राज ठाकरेंना टोला लगावला

Raj Thackeray: "Hate is the answer to love", Akbaruddin Owaisin's poetry target on raj Thackeray | Raj Thackeray: 'तेरी हैसियत नही की'; अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंवर शायरीतून निशाणा

Raj Thackeray: 'तेरी हैसियत नही की'; अकबरुद्दीन औवेसींचा राज ठाकरेंवर शायरीतून निशाणा

googlenewsNext

औरंगाबाद/मुंबई - एमआयएमचे नेते आ. अकबरुद्दीन औवेसी यांनी आज दुपारी खुलताबाद येथील विविध दर्गेला भेट देवून दर्शन घेतले. मात्र, त्यांनी यावेळी औरंगजेब याच्या कबरीचे दर्शन घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे. आजवर कोणीच या कबरीचे दर्शन घेतले नाही. मात्र, एमआयएमच्या नेत्यांनी दर्शन घेऊन नवीन राजकारणाची पद्धत रूढ करण्याचा प्रयत्न केला असल्याची टीका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे. तर, दुसरीकडे आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीकाही केली. 

''मी येथे कुणालाही उत्तर द्यायला आलो नाही, त्यांची लायकीच नाही, ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर मी काय बोलू, असे म्हणत अकबरुद्दीन यांनी शायरीतून नाव न घेता मनसेप्रमुखराज ठाकरेंना टोला लगावला. तसेच, देशात तिरस्काराचा वातावरण निर्माण केलं जातंय, पण अकबरुद्दीन औवसी नफरत का जबाव मोहब्बत से देगा, असेही ते म्हणाले. तुम्हारी हैसियत नही की मै तुझको जबाव दूँ, मेरा तो एक एमपी है, तू तो बेघर है, तेरा क्या जबाव दूँ.., असे म्हणत अकबरुद्दीन यांनी शायरीतून राज ठाकरेंवर टोला लगावला. 

अजानचा विषय आहे, मॉब लिंचींगचा आहे, हिबाजचा विषय आहे. मात्र, आम्ही कुणालाही घाबरत नाही. हे औरंगाबाद हे, ही अल्लाहची सरजमीन आहे. जर वेळच आली तर, जीवाची बाजी लावू मरणाऱ्यांच्या यादीत सर्वात पुढे अकबरुद्दीन औवेसी असेल, असे म्हणत औरंगाबादमधील जनतेला न घाबरण्याचे आवाहन औवेसींनी केले. 

कुत्रे भुंकत आहेत, भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या. कुत्रे भुंकत असतात. पण, वाघ शांतपणे निघून जात असतो. ते जाळं विणत आहेत, तुम्ही त्यात फसायचं नाही. आपण कायदा हातात घ्यायचा नाही, असे म्हणत अकबरुद्दीन औवेसींनी औरंगाबादमधील जनेतला संबोधित केले. आपल्या भाषणाच्या शेवटी हिंदुस्तान झिंदाबाद असे म्हणत, हा देश जेवढा तुमचा आहे, तेवढाच आमचाही आहे, म्हटले. या देशात आपण प्रेमानं राहूयात, असेही ते म्हणाले.

एमआयएमचे वरिष्ठ नेते आ. अकबरुद्दीन औवेसी खुलताबाद येथे येणार असल्याने मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आ. औवेसी यांना बघण्यासाठी व भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. खुलताबाद येथील बावीस खाजा दर्गा परिसरात दुपारी दीड वाजेच्या सुमारास आ. अकबरुद्दीन औवेसी यांचे आगमन झाले या ठिकाणी हजरत खाजा सय्यद जैनोद्दीन चिश्ती यांच्या दर्गेत जावून दर्शन घेतले. त्यानंतर औरंगजेब याच्या कबरीवर जावून त्यांनी फुले वाहिली. दुपारी दीड वाजेच्या सुमारास दर्गा परिसरातील मशीदमध्ये जावून सर्वसामान्यपणे नमाज अदा केली. त्याचबरोबर बाबा बु-हानोद्दीन दर्गेत  तसेच उरूस मैदान परिसरातील जर जरी जर बक्ष दर्गेत दर्शन घेतले. 

एमआयएमचे विकासाचे राजकारण

तर या प्रकरणी बोलताना एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी सर्व जन येथील दर्गांचे दर्शन घेतात, यात काहीच गैर नसल्याचे म्हटले आहे. तर खा. इम्तियाज जलील यांनी खुलताबाद येथे अनेक दर्गे आहेत. सर्वांचे दर्शन घेत आम्ही तिथे गेलो. यावेळी आम्ही कोणा एकाच्या कबरीकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत असे म्हटले आहे. तसेच औरंगाबाद येथे गरिबांच्या मुलांसाठी एका शाळेच्या इमारतीची पायाभरणी करून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओविसी बदलाचे राजकारण करत आहेत असा दावा केला. 
 

Web Title: Raj Thackeray: "Hate is the answer to love", Akbaruddin Owaisin's poetry target on raj Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.