तिसऱ्या दिवशीही पावसाच्या सरी

By Admin | Updated: July 5, 2016 00:08 IST2016-07-05T00:03:37+5:302016-07-05T00:08:10+5:30

औरंगाबाद : शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली. अधूनमधून विश्रांती घेत सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस पडत होता.

Rain on third day | तिसऱ्या दिवशीही पावसाच्या सरी

तिसऱ्या दिवशीही पावसाच्या सरी


औरंगाबाद : शहरात सलग तिसऱ्या दिवशीही पावसाची रिपरिप कायम राहिली. अधूनमधून विश्रांती घेत सायंकाळपर्यंत रिमझिम पाऊस पडत होता. त्यामुळे तापमानात कमालीची घट होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. सायंकाळपर्यंत शहरात केवळ ५ मि. मी. पावसाची नोंद झाली.
गेल्या तीन दिवसांपासून शहरावर वरुणराजाची कृपादृष्टी झाली आहे. शनिवारी आणि रविवारी दिवसभर शहरात रिमझिम पाऊस झाला. त्यानंतर आज सोमवारीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी १ वाजेनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. अधूनमधून विश्रांती घेत सायंकाळपर्यंत हा पाऊस पडत होता. त्यामुळे शहरालगतच्या भागातील रस्ते चिखलमय झाले. शहरातील दैनंदिन जीवनावरही पावसाचा परिणाम दिसून आला. पावसामुळे रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. दरम्यान, चिकलठाणा वेधशाळेत सायंकाळपर्यंत केवळ ५ मि. मी. पावसाची नोंद झाली.

Web Title: Rain on third day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.