औरंगाबादवर आभाळमाया, गणेशोत्सवाच्या काळात रोज पावसाची हजेरी, आजही जोरदार बरसला
By विकास राऊत | Updated: September 6, 2022 14:42 IST2022-09-06T14:41:19+5:302022-09-06T14:42:15+5:30
शहर व परिसरात ३१ ऑगस्टपासून दररोज पावसाची हजेरी लागते आहे.

औरंगाबादवर आभाळमाया, गणेशोत्सवाच्या काळात रोज पावसाची हजेरी, आजही जोरदार बरसला
औरंगाबाद: शहर व परिसरात मंगळवार सकाळपासून आभाळ भरून आले होते, दुपारी बारा वाजेच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला. ३१ आगस्ट पासून शहर व परिसरात रोज पाऊस हजेरी लावत असून यामुळे गणेशोत्सव देखावे पाहण्यासाठी भक्तांच्या आनंदावर विरजण पडते आहे.
७ दिवसांपासून रोज पाऊस होत असला तरी वातावरण दिवसा दमट आणि रात्री थंड असे आहे. परिणामी साथरोग वाढत असल्याचे सांगन्यात येत आहे. जिल्ह्यात पिकांना जीवदान मिळाले आहे, काही लघु प्रकल्पात अद्याप जलसाठा कमी आहे, जायकवाडी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सध्या १८ हजार क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
शहर व परिसरात ३१ ऑगस्टपासून दररोज पावसाची हजेरी लागते आहे. सुरुवातीचे दोन दिवस जोरदार पाऊस झाला. एक दिवस मध्यम तर तीन दिवस रिमझिम पावसाने हजेरी लावली. मंगळवारी दुपारी १२ वाजेपासून पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. त्यानंतर जोरदार पाऊस झाला.