शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे व्यवस्थापकांनी घेतली झाडाझडती

By admin | Updated: July 12, 2014 01:17 IST

जालना: दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे नांदेडचे विभागीय व्यवस्थापक पी.सी.शर्मा यांच्या शुक्रवारी दुपारी येथील स्थानक परिसरातील तपासणी

जालना: दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे नांदेडचे विभागीय व्यवस्थापक पी.सी.शर्मा यांच्या शुक्रवारी दुपारी येथील स्थानक परिसरातील तपासणी दौऱ्यात पिण्याच्या पाण्यासह स्वच्छता तसेच खाद्य पदार्थांच्या दर्जात आनंदीआनंद आढळून आला. त्यामुळे संतप्त व्यवस्थापकांनी अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांची कठोर शब्दांत कानउघाडणी केली.व्यवस्थापक शर्मा हे सकाळी अकरा वाजता रेल्वेस्थानकावर दाखल झाले. ते येणार याची अधिकाऱ्यांना पूर्वकल्पना होती. त्यामुळेच सर्व ताफा सज्ज होता. परंतु शर्मा यांनी स्थानकांत उतरल्याबरोबर थेट प्रवाशांबरोबर हितगुज सुरु केले. स्वत: प्लॉटफॉर्मवरील तसेच रेल्वेगाड्यांमधील प्रवाशांकडील तिकिटांची तपासणी सुरु केली. यावेळी काही फुकटे प्रवासी आढळून आल्याने त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात आली. ही मोहीम सुरु असतानाच शर्मा यांनी अचानक स्थानकावरील स्वच्छतेकडे मोर्चा वळविला. प्लॉटफॉर्म, लोहमार्ग, दादरा तसेच स्थानकाबाहेरील परिसराचीही पाहणी केली. लगेचच दोन्ही कँटीनला भेटी दिल्या. पिण्याच्या पाण्याची स्टँडचीही तपासणी केली. यावेळी काही खटकलेल्या गोष्टींची दखल घेतली. चहा आणि नाश्ता मानकांनुसार नसल्याने अन्न व औषधी प्रशासनाकडून तपासणी करावी असे आदेश शर्मा यांनी दिले. स्वच्छतेचे काम काटेकोरपणे झाले पाहिजे, त्यात कोणतीही हयगय करु नये अशा सूचना बजावल्या. यावेळी उपव्यवस्थापक ए.एन. रेड्डी, सहायक व्यवस्थापक मऊउल्ला, खालीककुमार, कनिष्ठ अभियंता लालू दास, स्थानक प्रमुख विजयकुमार वळवी उपस्थित होते. (प्रतिनिधी)