रेल्वे वाहतूक येतेय पूर्वपदावर; अजंता, राज्यराणी, देवगिरी एक्स्प्रेस पुन्हा धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 17:53 IST2020-12-01T17:51:34+5:302020-12-01T17:53:02+5:30

या ३ रेल्वेमुळे प्रवाशांची सुविधा होणार आहे.

Rail transport comes to a standstill; Ajanta, Rajyarani, Devagiri Express will run again | रेल्वे वाहतूक येतेय पूर्वपदावर; अजंता, राज्यराणी, देवगिरी एक्स्प्रेस पुन्हा धावणार

रेल्वे वाहतूक येतेय पूर्वपदावर; अजंता, राज्यराणी, देवगिरी एक्स्प्रेस पुन्हा धावणार

ठळक मुद्देया रेल्वेला २१ बोगी असतील

औरंगाबाद : अंजता एक्स्प्रेस १ डिसेंबर, नांदेड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस  ३ डिसेंबर, तर देवगिरी एक्स्प्रेस ५ डिसेंबरपासून धावणार आहे, अशी माहिती ‘दमरे’च्या नांदेड विभागाने दिली. या ३ रेल्वेमुळे प्रवाशांची सुविधा होणार आहे.

सिकंदराबाद – मनमाड अजंता विशेष रेल्वे १ डिसेंबर रोजी सिकंदराबादहून सायंकाळी ६.५० वाजता सुटेल. औरंगाबादेत ही रेल्वे सकाळी ५.३० वाजता येईल आणि ५.४० वाजता रवाना होऊन मनमाड येथे सकाळी ८.०५ वाजता पोहोचेल. मनमाड - सिकंदराबाद अजंता विशेष रेल्वे २ डिसेंबर रोजी मनमाडहून रात्री ८.५० वाजता सुटेल. औरंगाबादला रात्री १०.४० येईल आणि १०.४५ वाजता पुढे रवाना होईल.

नांदेड-मुंबई राज्यराणी विशेष रेल्वे  ३ डिसेंबर  रोजी नांदेडहून रात्री १० वाजता परभणी, जालना,  औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी १०.०७ वाजता पोहोचेल. 

मुंबई-नांदेड राज्यराणी विशेष रेल्वे ४ डिसेंबर रोजी मुंबई सीएसटी रेल्वेस्थानकावरून सायंकाळी ६.४५  वाजता सुटून  मनमाड, औरंगाबाद, जालना,  परभणीमार्गे हुजूर साहिब नांदेड येथे सकाळी ७.२० वाजता पोहोचेल.  या रेल्वेला १७ बोगी असतील.

सिकंदराबाद-नांदेड-मुंबई देवगिरी  विशेष रेल्वे ५ डिसेंबर रोजी सिकंदराबादहून दुपारी १.२५ वाजता सुटून नांदेड, परभणी, जालना,  औरंगाबाद, मनमाडमार्गे मुंबई सीएसटी येथे सकाळी ७.१० वाजता पोहोचेल. मुंबई-नांदेड-सिकंदराबाद देवगिरी विशेष रेल्वे ६ डिसेंबर  रोजी सीएसटी मुंबई रेल्वेस्थानकावरून रात्री ९.३० वाजता सुटून औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड मार्गे सिकंदराबाद  येथे दुपारी २.४० वाजता पोहोचेल. 

या रेल्वेला २१ बोगी असतील
नंदीग्राम एक्स्प्रेसच्या बोगीत वाढ नंदीग्राम विशेष एक्स्प्रेसमध्ये तीन अधिकच्या बोगी जोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने दिली.
 

Web Title: Rail transport comes to a standstill; Ajanta, Rajyarani, Devagiri Express will run again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.