राहुल शर्माच्या शतकी तडाख्याने औरंगाबाद विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:26 IST2018-04-11T01:25:34+5:302018-04-11T01:26:52+5:30
मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज राहुल शर्मा याचे सलग दुसरे शतक, कर्णधार स्वप्नील चव्हाण, विश्वजित राजपूत आणि प्रज्वल घोडके यांच्या शानदार अर्धशतकानंतर शुभम चाटे, प्रवीण क्षीरसागर, नितीन फुलाने यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर औरंगाबादने मंगळवारी परभणीवर एक डाव आणि ३५ धावांनी दणदणीत विजय मिळवला. राहुल शर्मा याच्या शतकी तडाख्याच्या बळावर औरंगाबादने पहिल्या डाव ८ बाद ३५६ धावांवर घोषित केला. बलाढ्य पुण्याच्या डेक्कनविरुद्ध १0१ धावांची खेळी करणाऱ्या राहुल शर्माने परभणीविरुद्धही आपला तोच फार्म कायम ठेवत १२७ चेंडूंत १७ खणखणीत चौकार व २ टोलेजंग षटकारांसह नाबाद १२२ धावांची खेळी केली.

राहुल शर्माच्या शतकी तडाख्याने औरंगाबाद विजयी
औरंगाबाद : मराठवाड्याचा शैलीदार फलंदाज राहुल शर्मा याचे सलग दुसरे शतक, कर्णधार स्वप्नील चव्हाण, विश्वजित राजपूत आणि प्रज्वल घोडके यांच्या शानदार अर्धशतकानंतर शुभम चाटे, प्रवीण क्षीरसागर, नितीन फुलाने यांच्या धारदार गोलंदाजीच्या बळावर औरंगाबादने मंगळवारी परभणीवर एक डाव आणि ३५ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
राहुल शर्मा याच्या शतकी तडाख्याच्या बळावर औरंगाबादने पहिल्या डाव ८ बाद ३५६ धावांवर घोषित केला. बलाढ्य पुण्याच्या डेक्कनविरुद्ध १0१ धावांची खेळी करणाऱ्या राहुल शर्माने परभणीविरुद्धही आपला तोच फार्म कायम ठेवत १२७ चेंडूंत १७ खणखणीत चौकार व २ टोलेजंग षटकारांसह नाबाद १२२ धावांची खेळी केली. कर्णधार स्वप्नील चव्हाणने ६५ चेंडूंतच ८ चौकार व एका षटकारासह ५३, विश्वजित राजपूतने ८0 चेंडूंत ६ चौकार व एका चौकारासह ६0 आणि प्रज्वल घोडकेने ९८ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ६१ धावा केल्या. परभणीकडून जयदीप भराडेने ६५ धावांत ३ गडी बाद केले. पुरुषोत्तम खांडेभराड, यश चांदेकर व सूरज गांगुर्डे यांनी प्रत्येकी १ गड बाद केला.
औरंगाबादचे सलामीवीर २४ धावांत परतल्यानंतर कर्णधार स्वप्नील चव्हाण आणि विश्वजित राजपूत यांनी तिसºया गड्यासाठी १0९ धावांची भागीदारी करीत औरंगाबादच्या विशाल धावसंख्येचा मजबूत पाया रचला. त्यानंतर राहुल शर्माने प्रज्वल घोडके याच्या साथीने पाचव्या गड्यासाठी १४९ धावांची भागीदारी करीत औरंगाबादला निर्णायक धावसंख्या उभारून दिली.
त्यानंतर औरंगाबादने परभणीचा पहिला डाव २३१ धावांत रोखला. परभणीकडून योगेश यादवने १0७, संदीप चव्हाणने ४७ धावांची झुंजार खेळी केली. औरंगाबादकडून प्रवीण क्षीरसागर व नितीन फुलाने यांनी प्रत्येकी ३, तर शुभम चाटेने २ गडी बाद केले. स्वप्नील चव्हाण व हरमितसिंग रागीने प्रत्येकी १ गडी बाद केला. त्यानंतर औरंगाबादने परभणीवर फॉलोआॅन लादत त्यांचा दुसरा डाव अवघ्या ९0 धावांत गुंडाळताना शानदार विजय मिळवला. परभणीकडून दुसºया डावात कर्णधार यश चांदेकरने सर्वाधिक ३४ धावा केल्या. औरंगाबादकडून शुभम चाटेने १७ धावांत ४ गडी बाद केले. त्याला प्रवीण क्षीरसागरने १६ धावांत २ व राहुल शर्माने १५ धावांत ३ गडी बाद करीत साथ दिली. नितीन फुलाने याने १ गडी बाद केला.