शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

चढ्या भावाने मुद्रांक विक्री करणारे रडारवर!

By admin | Updated: December 5, 2014 00:54 IST

शिरीष शिंदे ,बीड गोर-गरीब, विद्यार्थी व अडलेल्या-नडलेल्या लोकांची अडवणूक करुन त्यांना अधिक किंमतीला बाँड विक्री केले जात असल्याचा प्रकार सर्रास पहावयास मिळतो.

शिरीष शिंदे ,बीडगोर-गरीब, विद्यार्थी व अडलेल्या-नडलेल्या लोकांची अडवणूक करुन त्यांना अधिक किंमतीला बाँड विक्री केले जात असल्याचा प्रकार सर्रास पहावयास मिळतो. मात्र आता मुद्रांकाच्या मूळ किंमतीपेक्षा अधिक पैसे घेऊन विक्री करताना आढळून आल्यास संबंधीत मुद्रांक विक्रेत्याचा परवाना जिल्हा मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निलंबित केला जाणार आहे. न्यायालय, महाविद्यालय, प्लॉट, फ्लॅट आदी ठिकाणी बाँड देण्याची गरज अनेकांना भासते. बाँड विक्रेते मूळ किंमती पेक्षा दहा रुपये आगाऊ घेऊन बाँड विक्री करतात. विशेष म्हणजे, बाँड विके्रत्यांना बाँड विक्रीतून तीन टक्के कमीशन मिळते, असे असले तरीही बाँड विक्रेते आगावू पैसे मागतात. पैसे न दिल्यास अडवणूक केली जाते. शंभर रुपयांचा बाँड असेल तर दहा रुपये अधिक घेऊन बाँड दिला जातो. सर्वसामान्य माणूस दहा रुपयेच अधिक घेतले त्यामुळे ते फार खोलात जात नाहीत. तर काहींना बाँड हा मूळ भावातच मिळतो याची माहिती नसते. याचा गैरफायदा बाँड विक्रेते घेतात. परिणामी सामान्यांची एका प्रकारे पिळवणूक होते. एक बाँड विक्रेता दिवसभरात जर शंभर रुपयांचे शंभर बाँड दहा रुपये अतिरिक्त घेऊन विक्री करत असेल तर त्याला दिवसाकाठी हजार रुपये मिळतात. त्यात बाँडचे तीन टक्के कमीशन मिळवले तर एक बाँड विक्रेते १३०० रुपये कमवितो. हजार रुपये हे अतिरिक्त ठरतात. शासन नियमानुसार शंभर रुपयांचा बाँड शंभर रुपयालाच विक्री केला पाहिजे मात्र या उलटचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळते. त्यामुळे आता जिल्हा मुद्रांक अधिकारी कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी जाऊन पाहणी करतील. बाँड विक्रेता बाँडच्या किंमतीपेक्षा अतिरिक्त पैसे घेत असेल तर त्याच्यावर कारवाई होणार आहे. बाँडची किमत जेवढी आहे त्याच रकमेला बाँड विक्रेत्याने विक्री केला पाहिजे. सुनील बिवरे या बाँड विक्रेत्यावर कारवाई केली आहे. तो जादा दर घेऊन बाँड विक्री करत असल्याचे समोर आले असल्याने त्याचा पुरवठा बंद केला आहे. बाँड विक्रेते अधिक पैसे घेऊन बाँड विक्री करणार असल्याचे अढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई होईल. जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी कधीही जाऊन मी स्वत:, अधिकारी यांच्या मार्फत पहाणी केली जाईल. या दरम्यान दोषी आढळून आल्यास बाँड विक्रेत्यांवर कारवाई होईल. परवाना निलंबीत करणे, बाँडचा पुरवठा बंद करणे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाया संबंधीतावर केल्या जातील असे मुद्रांक जिल्हाधिकारी सुंदर जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.यापूर्वी जिल्हा प्रशासनाने बाँड विक्रेत्यावर कारवाई केल्यामुळे इतर बाँड विक्रेत्यांनीही धसका घेतला आहे. कुठल्याही क्षणी बाँड विक्रेत्यांची तपासणी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. यामुळे बीड जिल्ह्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी धसका घेतला असल्याचे पहावयास मिळत आहे.जादा दर आकारुन बाँड विक्रेत्यावर कारवाई करुन त्याचा पुरवठा बंद केल्यामुळे जिल्ह्यातील बाँड विक्रेते धास्तावले आहेत. यापुढे मुद्रांक जिल्हाधिकारी स्वत: बाँड विक्रेत्यांवर नजर ठेऊन असल्याने त्यांनी धसका घेतला आहे. प्रशासनाचेच याकडे लक्ष घातले असल्याने जास्त दराने बाँड विक्री करणाऱ्यांना चपराक बसणार आहे.