शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट कार्डमधून ‘आरसी’ देणे ठप्प

By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST

औरंगाबाद : वाहन खरेदीनंतर स्मार्ट कार्डमधून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) तयार करणाऱ्या कंपनीचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी (आरटीओ) असलेला करार संपला आहे.

औरंगाबाद : वाहन खरेदीनंतर स्मार्ट कार्डमधून वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) तयार करणाऱ्या कंपनीचा प्रादेशिक परिवहन कार्यालयाशी (आरटीओ) असलेला करार संपला आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कार्यालयात आरसी तयार करण्याचे काम ठप्प झाले आहे. त्यामुळे आता नवीन करार होईपर्यंत सोमवारपासून जुन्या पद्धतीप्रमाणे कागदी स्वरूपातील आरसी देण्याची तयारी आरटीओ कार्यालयाने केली आहे.देशभरातील वाहनांसंबंधी माहिती सेंट्रलाईज सर्व्हरच्या माध्यमातून कोणत्याही आरटीओ कार्यालयाला हवे तेव्हा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आरटीओ कार्यालयात कागदी स्वरूपातील आरसी बुकऐवजी स्मार्ट कार्ड देण्यास सुरुवात करण्यात आली. यासाठी स्मार्ट कार्डच्या वितरणाचे कंत्राट देण्यात आले होते. हे कंत्राट संपल्याने गेल्या तीन दिवसांपासून आरसी तयार करण्याचे काम थांबले आहे. परिणामी, वाहन नोंदणीसाठी आलेल्या फायली मोठ्या प्रमाणात पडून आहेत. शिवाय, आरटीओ कार्यालयात वाहन पासिंग, फिटनेस, आरसी बुक इ. कामांसाठी आलेल्या वाहनधारकांना सोमवारी येण्याचे सांगण्यात आले. स्मार्ट कार्डच्या वितरणाचे कंत्राट संपल्यांनंतर आरटीओ कार्यालयात सॉफ्टवेअर सुधारीकरणाचे काम हाती घेण्यात आले. यामुळे कार्यालयात लायसेन्स वगळता अन्य कामे बंद असल्याचे आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नवीन करार होईपर्यंत सोमवारपासून जुन्या पद्धतीनुसार कागदी आरसी देण्यात येणार आहे.