रबीसाठी मिळणार जायकवाडीतून पाणी
By Admin | Updated: October 15, 2014 00:47 IST2014-10-15T00:34:13+5:302014-10-15T00:47:17+5:30
औरंगाबाद : जायकवाडी धरणातून यंदा रबी पिकांसाठी दोन रोटेशन (पाणीपाळ्या) देण्याचे नियोजन आहे.

रबीसाठी मिळणार जायकवाडीतून पाणी
औरंगाबाद : जायकवाडी धरणातून यंदा रबी पिकांसाठी दोन रोटेशन (पाणीपाळ्या) देण्याचे नियोजन आहे. याशिवाय वरच्या धरणातून पाणी आल्यास आणखी एक जादा रोटेशन मिळू शकेल, अशी माहिती लाभक्षेत्र विकासचे (कडा) मुख्य अभियंता ई.बी. जोगदंड यांनी सांगितले.
मराठवाड्यातील सर्वांत मोठ्या जायकवाडी प्रकल्पात यंदा चांगला पाणीसाठा होऊ शकला आहे. त्यामुळे हंगामी पिकांसाठी नुकतेच डाव्या आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या दहा दिवसांपासून हे पाणी सुरू आहे. सध्याचा साठा विचारात घेऊन जलसंपदा विभागाने उपलब्ध पाण्याचे पुढील नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.